नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कोरोना प्रतिबंधासाठी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 8 ते 16 व्या आठवड्यादरम्यान दुसरा डोस घेता येईल, अशी शिफारस नॅशनल टेक्निकल ऍडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनने (एनटीएजीआय) केली आहे. सध्याच्या नियमानुसार पहिला डोस घेतल्यानंतर 12 ते 16 आठवड्या झाले नंतर दुसरा डोस देण्यात येताे.
कोरोना लसीसाठी एनटीएजीआयने कोविशिल्डची शिफारस केली आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन संदर्भात एनटीएजीआयने कोणतीही शिफारस केलेली नाही. कोरोना लसीच्या नियमानुसार कोवॅक्सिनचा पहिला डोस दिल्याच्या 28 दिवसानंतर दुसरा डोस दिला जावू शकतो. लसीकरणाच्या जागतिक डेटाचा अभ्यास करून कोविशिल्ड लसीबाबत ही शिफारस करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा