पुढारी ऑनलाईन डेस्क
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यातील प्राथमिक शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र मुंबई शहरातील शाळा १५ डिसेंबरपासून सुरू केल्या जाणार आहेत. मुंबई महापालिका शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे पाठवला होता. त्या प्रस्तावावर झालेल्या चर्चेनुसार मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळा १५ डिसेंबरपासून सुरू कराव्यात, असा निर्णय घेण्यात आला. (Mumbai School Reopening)
एक डिसेंबरपासून शाळा सुरू करण्यासाठी शाळांची आवश्यक ती तयारी झाली नसल्याची माहिती शिक्षकांनी दिली होती. शाळा सुरू करण्याबाबत कालपर्यंत कोणताही निर्णय झाला नसल्याने शिक्षक आणि पालकांमध्ये संभ्रम तयार झाला होता.
शाळा सुरू करण्याचे सरकारचे आदेश आल्यानंतर शिक्षण विभागाने सर्व शाळांसाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करून त्याचे काटेकोर पालन करण्यासाठी बंधनकारक केले आहे. (Mumbai School Reopening)
शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचना कोणत्या आहेत
हे ही वाचा