Satish Kaushik 
Latest

Satish Kaushik : प्रेंग्नेट असताना नीनाला सतीश यांनी घातली होती लग्नाची मागणी

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक आणि निर्माते आणि बॉलिवूड अभिनेते सतीश कौशिक ( Satish Kaushik ) यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यानंतर त्याच्या अचानक निधनाने बॉलिवूड कलाकारांसह चाहत्याच्यात शोककळा पसरली. यादरम्यान त्याच्या जीवनातील अनेक जुन्या गोष्टीना उजाळा कलाकार देत आहेत. सतीश यांनी बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता प्रेंग्नेट असताना लग्नासाठी मागणी घातल्याची माहिती समोर आली आहे. 'सच कहूँ तो' या आत्मचरित्रात नीनाने याविषयी खुलासा केला आहे.

अभिनेत्री नीना गुप्ताने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर सतीश कौशिक यांच्या ( Satish Kaushik ) निधनांनतर एक पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. यात तिने 'आज सकाळी मित्र सतीश कौशिक याच्या निधनाची दुख: द बातमी मिळाली आणि खुपच उदास वाटले. कारण आमची मित्री दिल्लीच्या कॉलेजपासून होती. त्यांनी मला वेळोवेळी खंबीर साथ दिली होती. मुलगी आणि पत्नी शशी यांना खंबीर बनण्याची शक्ती मिळो. त्याच्या आत्मास शांती मिळो. यापुढे मी काय बोलू'. असे तिने म्हटलं आहे. याचदरम्यान 'सच कहूँ तो' या आत्मचरित्र नीनाने लिहून ठेवलेल्या सतीश याच्या जुन्या आठवणींच्या चर्चांना उधान आलं आहे.

माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्सपासून नीना गुप्ता प्रेंग्नेट असाताना सतीश कौशिक यांनी तिला लग्नाची मागणी घातल्याची माहिती समोर आली आहे. विवियन हा आधीच विवाहित असल्याने तो त्याच्या पत्नीला सोडून नीनाशी लग्न करू शकत नव्हता. हा काळ नीनासाठी खूपच कठीण असल्याने सतीश यांनी पुढाकार घेत आपण लग्न करू असे म्हटलं होतं. 'सच कहूँ तो' या आत्मचरित्रात लिहिलं आहे की, 'काळजी किंवा घाबरू नकोस, जर येणारे मुलं सावळ्या रंगाचा जन्मले, तर ते माझे आहे असे म्हणून टाक. दोघेजण लवकरच लग्न करू यामुळे कोणाला संशय येणार नाही'

यावर सतीश कौशिक यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, 'त्यावेळी लग्न न करता मुलाला जन्म देण्याचा निर्णय नीनाने घेतला होता. एका मित्राच्या नात्याने मी तिच्या पाठिशी खंबीर उभा राहिलो आणि तिला आत्मविश्वास दिला. त्यावेळेपासून आमच्यातली मैत्री घट्ट झाली होती.' यानंतर नीनाने मसाबाला जन्म दिला. मसाबा ही प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT