कागज २  
Latest

Kaagaz 2 : अश्रू न थांबवणारी कहाणी, ‘कागज २’ चा ट्रेलर रिलीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेते सतीश कौशिक यांच्या स्मृतिदिनाआधी त्यांचा शेवटचा चित्रपट 'कागज २' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. (Kaagaz 2 ) ही कहाणी नेतेमंडळी रस्त्यावर उतरल्यानंतर होणाऱ्या गोंधळामुळे सामान्य लोकांची काय परिस्थिती होते आणि यामध्ये का मुलाची मृत्यू केवळ या कारणामुळे होतो, कारण की, तिला वे‍ळेवर हॉस्पिटलपर्यंत नेता येत नाही. (Kaagaz 2)

संबंधित बातम्या –

सतीश कौशिक यांच्या निधनाच्या ११ महिन्यांनंतर त्यांचा अखेरचा चित्रपट 'कागज २' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. जो तुमचे अश्रू रोखू शकणार नाही. शिवाय मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण करून तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. त्यांचे मित्र आणि अभिनेते अनुपम खेर यांनी देखील चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अनुपम खेर यांनी लिहिलं- माझा मित्र सतीश कौशिकचा पॅशन प्रॉजेक्ट 'कागज २' चा ट्रेलर.

चित्रपटात दाखवण्यात आलं आहे की, सतीश कौशिक यांची मुलगी स्टूलवरून पडते. आणि तिच्या डोक्याला मार लागतो. त्यानंतर तिला रुग्णालयात नेताना रस्त्यामध्ये एका नेत्याची रॅली आणि गर्दी दिसते. सतीश गाडीतून बाहेर येऊन ओरडून सर्वांकेड मदत मागतात, पण त्यांचे कुणीही ऐकत नाही. अखेर, ते रुग्णालयात पोहोचतात, तेव्हा डॉक्टरांकडून उत्तर मिळते की, जर १५ मिनिटे त्यांनी आधी आणलं असतं तर आम्ही तिला वाचवू शकलो असतो.

दर्शन कुमार, स्मृति कालरा, नीना गुप्ता यासारखे दिग्गज कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. 'कागज २' ची निर्मिती सतीश कौशिक एंटरटेनमेंट एलएलपी आणि व्हिनस वर्ल्डवाईड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, शशी सतीश कौशिक, रतन जैन आणि गणेश जैन यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT