पुढारी ऑनलाईन : देशात तपास यंत्रणांचा वापर करून पक्ष फोडण्याच राजकारण सुरू आहे. जस शिवसेनेबाबतीत घडलं तसंच आता राष्ट्रवादीबाबत होताना दिसून येत आहे. राष्ट्रवादीतील काही आमदारांवर दबाव टाकण्यात येत आहे. अजित पवार हे आपले मत परखडपणे मांडतात, मी त्यांच्याशी बोललो आहे, मात्र ते राष्ट्रवादी पक्ष सोडून जातील असं वाटत नाही अशी भूमीका ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मांडली.
इडी, सीबीआय, पोलिस अशा विविध तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांवर भाजपकडून दबाव टाकला जात आहे. या प्रकारे शिवसेना फोडून शिंदे गटासोबत भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली आहे. आता हेच राष्ट्रवादीच्या बाबतीत घडत असल्याचे राऊत म्हणाले.
..तर महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील ती दुर्देवी घटना टळली असती
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात ११ श्री सदस्यांचा झालेला मृत्यू हा दुर्देवी आहे. कार्यक्रमाची आखणी करताना राज्य सरकारने विचार करायला हवा होता. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाची सगळी तयारी ही फक्त व्हीआयपी लोकांसाठीचं केली होती. या ठिकाणी श्री सदस्यांचा विचार करण्यात आला नाही. दुपारच्या कडक तळपत्या उन्हात हा कार्यक्रम घेण्यात आला. त्या एवजी सायंकाळी हा कार्यक्रम घेतला असता, तर बरे झाले असते म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याची वेळ पाहून हा कार्यक्रम घेतल्याची टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.
काल रात्री नागपूरची सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांनी रूग्णालयात जाउन रूग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचं ते म्हणाले. दरम्यान काँग्रेसचे वेणुगोपाल आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा :