Latest

Sanjay Raut vs Narayan Rane : आजच्या राजकारणात संजय राऊत जोकर – नारायण राणे

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : "शिवसेना संपवायची सुपारी मी नाही तर राऊतांनी घेतली आहे. आजच्या राजकारणातील संजय राऊत जोकर आहे. तो मातोश्रीला सुरुंग लावणारं विष आहे. तो ज्याच्या खांद्यावर हात ठेवेल तो गळलाचं म्हणून समजा. तो विषारी प्राणी आहे" अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. (Sanjay Raut vs Narayan Rane)

शिवसेनेच्या मुखपत्रातील एका अग्रलेखावरून केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरुद्ध संजय राऊत असा वाद पेटला आहे. राणे यांनी एका कार्यक्रमात या अग्रलेखावरून राऊतांना इशारा दिला होता. दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. आज सकाळी माध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

शिवसेना संपवायची सुपारी मी नाही तर राऊतांनी घेतली

नारायण राणे माध्यमांशी बोलताना म्हणाले की,"शिवसेनेच्या पहिल्या ३९ वर्षात ती वाढवण्यासाठी हा नारायण राणे होता. शिवसेना संपवायची सुपारी मी नाही तर राऊतांनी घेतली आहे. आता त्याला शिवसेना संपवण्याचा आनंद होतोय. आता साधे १२ पण लोक राहिले नाहीत. आता तो शेवट करायला तयार आहे." पुढे असेही ते म्हणाले की," संजय राऊत यांनी केलेलं धार्मिक, सामाजिक, वैचारिक, विकासात्मक असं एखादं एक तरी काम सांगा. तो संपादक म्हणून लिहतो एख तरी लेख बौद्धीक, विकासात्मक लिहलेला लेख दाखवा.  पत्रकार म्हणून काही पावित्र्य असतं. आचारसंहिता असते. त्याने शिव्या देण्यापलिकडे काहीही केलेलं नाही.

मला प्रोटेक्शन मी मागितलेले नाही तर ते मला ९० पासूनच आहे. पोलिसांनी जबरदस्ती दिलं आहे. त्यावेळी तो शिवसेनेत नव्हता. तर तेव्हा तो 'लोकप्रभा' मध्ये शिवसेने विरुद्ध लेख लिहायचा. मी संजय राऊत जिथे बोलवेल तिथे जायला तयार आहे. मी केंद्रीय मंत्री आहे. मला काम आहेत. मी राज्यात उद्योग आणि रोजगार वाढण्याचं काम करतो. हे उद्योग संजय राऊतचं नाही."

राऊतांना चप्पलानं मारलं नाही तर मला विचारा

नारायण राणे पुढे म्हणाले, "मी तुम्हाला सांगतो मी एक ना एक दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार. राऊतांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल जे काही बोलले आहे ते उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे. मी खासदार झाल्यानंतर संजय राऊत राज्यसभेत माझ्याजवळ येऊन बसायचा आणि उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेबद्दल बोलायचा. ते मी त्या दोघांना सांगणार आहे. तेव्हा उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे या दोघांनी राऊतांना चप्पलानं मारलं नाही तर मला विचारा."

Sanjay Raut vs Narayan Rane : विषारी प्राणी आहे

यावेळी नारायण राणे यांनी राऊतांवर अतिशय कडक टीका केली. राणे म्हणाले, "राऊत मातोश्रीला सुरुंग लावणारं विष आहे. तो ज्याच्या खांद्यावर हात टाकेल तो गळलाचं म्हणून समजा. असा तो विषारी प्राणी आहे. मी एक ना एक दिवस माझं प्रोटेक्शन तोडून संजय राऊत यांना भेटणार. पुढे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले,"राज्याच्या विकासाबद्दल, रोजी रोटीबद्दल, शेतकऱ्यांना भाव दर देण्याबद्दल, बेरोजगारीबद्दल बोला. पुढे बोलताना ते म्हणाले," उद्धव ठाकरे असो वा संजय राऊत यांनी अडीच वर्षात कोणत्या क्षेत्रात काम केले आहे, राज्याचं दरडोई उत्पन्न वाढवलं, रोजगार दिला आहे, ते सांगा. बाळासाहेबांच्या नंतर किती शिवसैनिकांचे संसार या शिवसेनेने उभे केले की उद्धस्त केले ते सांगा. आजच्या राजकारणातील संजय राऊत छोटा जोकर आहे.  मला परत संजय राऊत बद्दल विचारु नका."

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT