Latest

 … हे तर सूडाचे राजकारण – संजय राऊत 

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण २३ रोजी विधान भवनातील मध्‍यवर्ती सभागृहात होणार आहे.  या कार्यक्रमाच्‍या  निमंत्रण पत्रिकेवर उद्धव ठाकरे याचे नाव नाही. याबाबत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज म्हणाले की,  "एक शिष्टाचार असतो, हिंदुह्रदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच तैलचित्र लावत आहोत आणि त्यांच्या चिरंजीवांना जे मुख्यमंत्रीही होते त्यांना आमंत्रण नाही. म्हणजे तुम्ही केवळ राजकारण करत आहात. महाराष्ट्रात सूड आणि  बदला घेण्याचे राजकारण सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं बाप पळवणारी टोळी आली आहे. त्यामध्ये तथ्य आहे."

यावेळी राऊत म्‍हणाले की, आम्ही जेव्हा सावरकर यांच तैलचित्र लावलं होत तेव्हा आम्ही  त्यांच्या नातेवाईकांच निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव लिहलं होतं. हे शिष्‍टाचार विधानसभा असो वा संसद पाळले जातात. पण महाराष्ट्राच्या राजकराणात या प्रथा परंपरा पाळल्या जात नाहीत.राज्यात कोणत्याही पंरंपरा पाळल्य़ा जात नाहीत.  तैलचित्राच्या पाठीमागे काय राजकराण आहे याबद्दल सांगायची गरज नाही.  महाराष्ट्रात सूड आणि  बदला घेण्याच राजकारण सुरु आहे.

…तर महाराष्ट्रावर उपकार होतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार दि. १९ जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येत असून ते यावेळी सुमारे ३८,८०० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यामध्ये प्रामुख्याने मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ या मार्गिकांचे लोकार्पण तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची पायाभरणीही करणार आहेत. यावर बोलताना ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या कामाचं उदघाटन करायला येणार आहेत ती बरीचसी काम मुंबई महापालिका, शिवसेनेने केली आहेत. एका अर्थाने मोदी आमच्याच कामावर शिक्‍कामोर्तब करत आहेत. पंतप्रधान उदघाटन करत असलेल्या कामाची पायाभरणी शिवसेनेची आहे. "मुख्यमंत्र्यांनी त्या व्यासपीठावरुन पंतप्रधानांना  विनंती करायला हवी की, महाराष्ट्रातील जे  कोटीचे उद्योग पळवून नेले  ते आम्हाला द्या. जर हे आम्ही सांगू  शकलो तर या महाराष्ट्रावर उपकार होतील. जे गेले ते आम्हाला द्या."

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT