नाशिक : शिवसेना नेते खासदार संजय राऊत शुक्रवारपासून (दि. 15) दोन दिवस नाशिक दौर्यावर येत आहेत. मनपाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा. राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या कोअर कमिटीची बैठक व विविध विकासकामांचे लोकार्पणही होणार आहे.
शिवसेनेच्या कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी दुपारी 2 वाजता होणार आहे. सायंकाळी 4.30 वाजता ते फाळके स्मारकाची पाहणी करतील. या प्रभागाच्या माजी नगरसेविका संगीता जाधव यांनी उभारलेल्या भागवत सभागृहाचे लोकार्पण होणार आहे. सायंकाळी 5.30 वाजता बाळा दराडे यांच्या प्रभागात रस्ते लोकार्पण व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन, सायंकाळी 6 वाजता नंदिनी नदीला संरक्षण जाळी लावण्याच्या कामाचे लोकार्पण व भूमिगत तारा टाकण्याची सुरुवात करण्यात येणार आहे. शनिवारी (दि.16) सकाळी माजी नगरसेविका सीमा ताजणे यांच्या प्रभागात रस्त्यांचे भूमिपूजन, तर दुपारी 12 वाजता पत्रकारांशी संवाद साधतील. सायंकाळी 4.30 वाजता 'आयएमए'च्या कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या प्रभागातील नैसर्गिक नाला, केबिन हॉल यांचे भूमिपूजन व उद्घाटन खा. राऊत यांच्या हस्ते होणार आहे.