Latest

Sanjay Raut : संजय राऊत यांना जामीन; शिवसेनेच्या वाघाची सुटका झाली : सुषमा अंधारे

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाइन डेस्क : शिवसेना (ठाकरे गट) नेते खा. संजय राऊत यांना आज (दि. 09) जामीन मंजूर झाला आहे. जवळपास 100 दिवसांच्या ईडीच्या कोठडीतून आज त्यांची सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली असून अनेक नेत्यांनी कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी 'Tiger Is Back' असे ट्विट करत या निर्णयाचे स्वागत केले आहे.

शिवसेना कुटुंबातील एक लढवय्या सदस्य ज्यांचा आवाज दाबण्यासाठी प्रयत्न केले गेले पण ते लढले आणि आज त्यांना जामीन मिळतोय. याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे असे मत अंधारे यांनी यावेळी व्यक्त केले. 'मी मरण पत्करेन पण शरण पत्करणार नाही' असे ठामपणे सांगणारा आमचा नेता परत आला आहे असे सांगताना त्या भाऊक झाल्या. दरम्यान, संजय राऊत यांच्या स्वागतासाठी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्ते व नेते जमू लागले आहेत.

यावेळी अंधारे म्हणाल्या, बाळसाहेबांचा लढाऊ सरदार हा कधीही हात टेकत नाही, तो फक्त लढतो. बाळासाहेब ठाकरे यांचा लढाऊ सरदार कसा असावा याचा आदर्श संजय राऊत यांनी घालून दिला असल्याचे अंधारे यावेळी म्हणाल्या. जे सुखात सोबत असतात ते इतके खरे नसतात पण जे दुःखात साथ देतात ते खरे असतात असा टोलाही त्यांनी यावेळी शिवसेनेतून बाहेर गेलेल्या 40 आमदारांना लगावला.

'कर नाही त्याला डर नसते' त्यामुळे संजय राऊत लढत राहिले आणि ज्यांना 'डर' होता ते त्यांच्याकडे गेले असेही त्या यावेळी म्हणाल्या.
ज्यांना शिवसेना संपवायची आहे, जे शिवसेनेला संपवण्याची भाषा करतात त्यांच्यासाठी ही एक चपराक आहे असे सांगून आधारे यांनी कार्यकर्त्यांना घाबरू नका थोडासा अंधार पडला होता, पण आता पुनः पहाट होतेय असेही सांगितले. संजय राऊत यांना अटक झाल्यापासून शिवसेनेच्या आजपर्यंतच्या प्रत्येक कार्यक्रमात संजय राऊतांची खुर्ची ठेवलेली असायची याचा उल्लेख करून 'हा मान मिळवण्यासाठी खूप कष्ट सोसावे लागतात' असेही त्या म्हणाल्या.

हे वचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT