पुढारी ऑनलाईन डेस्क : Sanjay Raut Bail : पत्राचाळ प्रकरणी ईडीने अटक केल्यानंतर 100 दिवसानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राऊतांना जामीन मिळताच कोर्टात टाळ्यांचा कडकडाट झाला. तर संजय राऊत यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची डीजेची तयारी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ईडीने मात्र या निर्णयाला विरोध करत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राऊतांच्या जामिनाला स्थगिती मिळावी यासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ईडीने ठोठावले आहे. त्या सुनावणीकडे आता अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यावर अनेक नेत्यांनी आपआपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे यांनी निर्णयाचे स्वागत करत संजय राऊत हे डरपोक नाहीत असे उद्गार काढले आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब यांच्या गटाकडून संजय राऊत यांच्या स्वागतासाठी डीजेची तयारी केली आहे.
Sanjay Raut Bail : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आमचा सरसेनापती परत येत आहेत. शिवसेनाचा हिरा परत आला आहे, असे म्हटले आहे.
Sanjay Raut Bail : आम्हाला घाबरायचे कारण नाही – उदय सामंत
संजय राऊत यांच्या जामीनावर उदय सामंत यांनी कोणतीही थेट प्रतिक्रिया देण्याचे टाळले. कोर्ट दोन्ही पक्षांचे ऐकून निर्णय देते. मी कॅबिनेट मंत्री आहे. त्यामुळे अशा प्रकारे काहीही बोलणे योग्य नाही. मात्र, या निर्णयाचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. आम्हाला घाबरण्याचे कारण नाही, असे म्हटले आहे.
हे ही वाचा :