sangli st strike : राज्य सरकारने एसटी कर्मचार्यांना पगार वाढ दिल्याने 25 ते 30 टक्के कर्मचारी गुरुवारी कामावर हजर झाले. तर काही कर्मचारी मात्र संपावर ठाम आहेत. त्यामुळे एसटी कर्मचार्यांच्यात फुट पडल्याचे स्पष्ठ झाले.
दरम्यान येथील बसस्थानकातून जिल्हाअंतर्गत तालुक्याच्या ठिकाणी बस वाहतूक सुरु झाली आहे. त्याशिवाय बसस्थानकातून वडाप वाहतूकही सुरु आहे.
जिल्ह्यात गेल्या १९ दिवसांपासून सुरू असणार्या एस.टी.संप बुधवारी राज्य सरकारच्या पगार वाढीच्या घोषणामुळे मागे घेतला जाईल, असे वाटत होते. मात्र काही कर्मचारी मागण्यावर ठाम आहेत.
आ. सदाभाऊ खोत आणि आ. गोपीचंद पडळकर यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर सायंकाळपर्यंत ३० टक्के कर्मचारी कामावर हजर झाले होते. उद्यापासून आणखी कर्मचारी कामावर हजर होतील, असा प्रशासनास अंदाज आहे.
गुरुवारी दुपारपर्यंत ९८ एस.टी गाड्या धावल्या. या तालुक्याच्या ठिकाणी जात आहेत.
त्याशिवाय पुण्यासाठी शिवशाही खासगी बस वाहतूकही सुरु आहे. मात्र इतर जिल्ह्यात जाणारी बस वाहतूक बंद आहे.
(दि. २८) ऑक्टोबर पासून एस.टी. कर्मचार्यांनी संप सुरू होता. विलिनीकरण होत नाही तोपर्यत संप मागे घेणार नाही, असा पवित्रा कर्मचार्यांनी घेतला. त्यामुळे आंदोलन जोरदार सुरु होते.
सरकारने पगार वाढ देऊन कर्मचार् यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
मात्र काही कर्मचारी अद्यापही मागण्यावर ठाम आहेत.
दरम्यान बसस्थानकांतून वडाप, रिक्षा अशा खासगी वाहतूकही दिवसभर सुरू होती.
कामांवर न येणार्या कर्मचार्यांवर गेल्या तीन-चार दिवसांपासून कारवाई करण्यात येत आहे.
आतापर्यंत २८४ जणांचे निलंबन करण्यात आले आहे.
आतापर्यंत ५० जणांची सेवासमाप्ती केली आहे. इतर काही कर्मचार्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत.
नोटीस बजावण्यात आलेले कर्मचारी कामावर हजर न झाल्यास त्यांचीही सेवा समाप्ती करण्याचा इशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.
मात्र जोपर्यत मागन्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा पवित्रा कर्मचार्यांनी घेतला आहे. त्यामुळे संप चिघळण्याची शक्यता आहे.
कामगार संघटना विरहीत जे कामगार होते, त्यांच्या लढ्याचे हे यश आहे. आंदोलनामुळे सरकारला पगार वाढ देणे भाग पडले. देशातील ही पहिलीच घटना आहे. एसटी ही राज्याची रक्त वाहिनी आहे. ती ठिकली पाहिजे. विलिकरणाच्या मागणीसाठी आमचा लढा सुरुच राहिल.
आ. सदाभाऊ खोत.