samantha ruth prabhu 
Latest

Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समंथाचा मोठा खुलासा, ‘मी २५ कोटींची आर्थिक मदत…’

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : Myositis वरिल उपचारासाठी २५ कोटी रुपयांची आर्थिक मदत घेतल्याचे अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने नाकारले आहे. समंथा हीला मायोसिटीस या दुर्मिळ आजाराने गाठले आहे. दरम्यान या आजाराच्या उपचारासाठी समंथाने तेलगू अभिनेत्याकडून २५ कोटी रुपयांची मदत घेतल्याची चर्चा सुरु होती. मात्र, संमथाने कोणतीही मदत घेतली नसल्याचे स्पष्ट केले आहे. इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून तिने ही माहिती दिली आहे. या स्टोरीमध्ये तिने मला स्वत:ची काळजी स्वत: घेता येते, असे म्हटले आहे.
मला स्वत:ची काळजी स्वत: घेता येते. (Samantha Ruth Prabhu)

समंथा तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हणाली, "आत्तापर्यंत मी जे काम केलं आहे त्यासाठी कमी पैसे मिळालेले नाहीत. मी स्वत:ची काळजी स्वत: घेऊ शकते. Myositis हा एक दुर्मिळ आजार आहे. या आजाराला अनेक लोक सामना करत आहेत. या आजारासंबंधी आम्ही जी माहिती देत आहोत, त्यावर लक्ष द्यावे. (Samantha Ruth Prabhu)

जवळपास एक वर्षापूर्वी सामंथाला 'Myositis' विषयी समजलं होतं. तेव्हा तिने इन्स्टाग्रामवर फॅन्ससोबत ही माहिती शेअर केली होती. तिने एक इन्स्‍टाग्रामवर एक मोठी नोट लिहिली होती. त्यात तिने म्हटलं होतं की- 'डायगनोसिसला जवळपास एक वर्ष गेले. एक वर्षापासून जबरदस्तीने एक नवं नॉर्मल आयुष्य जगत आहे. माझ्या शरीरासोबत माझं स्वत: ची लढाई… न मीठ, न साखर आणि न अन्न, खासकरून औषधांसोबत कॉकटेलसह एक जबरदस्तीने शटडाऊन आणि जबरदस्तीने रीस्टार्ट.' (Samantha Ruth Prabhu)

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT