Salman Khan 
Latest

Salman Khan: ‘बॉलीवूडमधील ३५ वर्षे ३५ दिवसांसारखे…’ सलमान खानने शेअर केला बॉलीवूडमधील प्रवास (पाहा व्हिडिओ)

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान याच्या बॉलीवूडमधील कारकिर्दीला ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने त्‍याने त्‍याच्‍या  इन्स्टाग्रामवरून  शनिवारी (दि. २६)  रात्री उशिरा त्याचा बॉलीवूडमधील ३५ वर्षांचा प्रवास शेअर केला आहे. (Salman Khan)

सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांसाठी एक संदेशही लिहला आहे. यामध्ये त्यानं म्हटले आहे की, ३५ वर्षे ३५ दिवसांसारखे गेली. तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद! असे म्हणत सलमान खानने हार्ट इमोजी देखील शेअर केली आहे. सलमान खान याने शेअर केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये आजपर्यंत त्याने मोठ्या पडद्यावर साकारलेल्या अनेक भूमिकांची मांडणी (Salman Khan) केली आहे.

Salman Khan: 'बीवी हो तो ऐसी'मधून बॉलीवूडमधील करिअरला सुरूवात

अभिनेता सलमान खानने १९८८ मध्ये रेखा आणि फारुख शेख यांच्यासोबत 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटातून बाॅलीवूडमधील आपल्या करिअरची सुरुवात केली. तीन दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या कारकिर्दीत सलमान खानने अभिनेता, निर्माता तसेच इतरांना मदत करणारा व्यक्ती म्हणून काम केले आहे. सलमान खानने केवळ चित्रपटसृष्टीवरच नाही तर जगभरातील लाखो चाहत्यांच्या हृदयातही आपला ठसा उमटवला आहे.

दिवाळीत हाेणार 'टायगर 3' रिलीज

किसी का भाई किसी की जानच्या रिलीजनंतर सलमान या दिवाळीत 'टायगर 3' रिलीज करण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्या भूमिका आहेत.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT