पुढारी ऑनलाईन डेस्क : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोवर दुखाचा डोंगर कोसळला. त्याच्या नवजात जुळ्या मुलांपैकी एका बाळाचा मृत्यू झाला तर दुसरे बाळ व आई सुरक्षित आहेत. (Cristiano Ronaldo)
मॅनचेस्टर युनायटेडचा स्टार स्टारयकर ख्रिस्तियानो रोनाल्डो व जॉर्जीना रोर्डिग्ज दोघांनी बाळाच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करून दिली. जुळ्या बाळ्यांच्या डिलेवरी दरम्यान एका मुलाचा मृत्यू झाला. तर मुलगी व आई दोन्ही सुरक्षित आहेत असे देखील त्याने यावेळी सांगितले. रोनाल्डोच्या पोस्टमुळे ही बातमी जगभरात वाऱ्यासारखी पसरली. ही बातमी समजताच फुटबॉल विश्वासह जगभरातून रोनाल्डोचे व परिवाराचे सांत्वन वेगवेगळ्या स्तरातील व्यक्ती करत आहेत.(Cristiano Ronaldo)
ख्रिस्तियानो रोनाल्डो व जॉर्जिना यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हणले आहे की, आम्ही या धक्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहोत, आम्ही नेहमी आमच्या बाळावर प्रेम करत राहीन असे यावेळी ते म्हणतात. तू आमचा अँजेल आहेस. या क्षणी सुरक्षित असलेली नवजात मुलगी आम्हाला या प्रसंगातून जाताना धैर्य देत आहे. असे यांनी म्हटले आहे.
या पोस्टमध्ये त्याने तो म्हणतो की एका आई-बापाच्या जीवनातील सर्वात दुखद काळात आम्ही आहोत. तसेच त्याने जॉर्जिनावर उपचार करणरे डॉक्टर,नर्स यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. रोनाल्डोने गेल्या वर्षी एक सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्ट केली होती त्यात जुळी मुले होणार आहेत याची माहिती त्याने दिली होती.