Sachin Tendulkar On Indian Team 
Latest

Sachin Tendulkar On Indian Team : सेमीफायनल मधील पराभवानंतर सचिन तेंडूलकरने दिली ‘अशी’ प्रतिक्रीया

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाला टी २० विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध (IND VS ENG) दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर टीम इंडियावर सर्वत्र टीका होत आहे. रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इंग्लंडविरुद्धच्या दारूण पराभवानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची पहिली प्रतिक्रीया आली. या विषय बोलताना सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याने टीम इंडियासाठी मोठी गोष्ट सांगितली आहे. (Sachin Tendulkar On Indian Team)

धावसंख्या पुरेशी नव्हती (Sachin Tendulkar On Indian Team)

भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर म्हणाला, 'इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीतील पराभव खूपच निराशाजनक आहे. अॅडलेड ओव्हलमध्ये 168 धावांचे लक्ष्य पुरेसे नव्हते, कारण मैदानाचा आकार असा विचित्र आहे, कारण मैदानावर साईडच्या सीमारेषा लहान आहेत. त्यामुळे 190 आणि त्‍याच्‍या जवळ असलेली धावसंख्‍या चांगली ठरली असती. आम्ही बोर्डवर चांगली धावसंख्या उभी करु शकलो नाही. आम्ही विकेट घेऊ शकलो नाही. इंग्लंड हा तगडा संघ आहे त्यामुळे त्यांनी आपला 10 गडी राखून पराभव केला.

एका सामन्याच्या आधारे संघाची समिक्षा करु नका

सचिन तेंडुलकर पुढे म्हणाला, 'फक्त एका सामन्याच्या आधारे तुम्ही भारतीय संघाच्या कामगिरीची समिक्षा करू शकत नाही. आपण टी-२० क्रिकेटमधील नंबर वन संघ आहोत. हे एका रात्रीत घडत नाही. इथपर्यंत पोहोचण्यासाठी दीर्घकाळ चांगले क्रिकेट खेळावे लागते. खेळाडूंनाही बाहेर जाऊन अपयशी व्हायचे नसते. खेळात चढ-उतार येतच राहतात. यात आपण एकत्र असायला हवे. (Sachin Tendulkar On Indian Team)

भारताचा दारुण पराभव

2022 च्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावण्याचा प्रबळ दावेदार म्हणून भारतीय संघाकडे पाहिले जात होते. पाकिस्तानचा ४ विकेट्सने पराभव करत टीम इंडियाने चांगली सुरुवात केली, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ विकेट्सने पराभव झाल्यानंतर टीम इंडियाची गाडी रुळावरून घसरली. त्यानंतर बांगलादेशविरुद्ध अत्यंत कठीण परिस्थितीत टीम इंडियाने 5 धावांनी सामना जिंकला. उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडविरुद्ध 10 विकेट्सने दारूण पराभव स्वीकारावा लागला.

गोलंदाजांचे अपयश

उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 168 धावा केल्या. इंग्लंडने एकही विकेट न गमावता सहज लक्ष्याचा पाठलाग केला. भारतीय गोलंदाज अत्यंत वाईट पद्धतीने अपयशी झाले. त्याचवेळी रोहित शर्मा, केएल राहुल, ऋषभ पंत यांना चांगली फलंदाजी करता आली नाही. याच कारणामुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT