SA vs Ban Bangladesh Win By 38 Runs 
Latest

SA vs Ban : बांगलादेशने रचला इतिहास, पहिल्यांदाच द. आफ्रिकेला त्यांच्याच मैदानावर केले पराभूत

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेश क्रिकेट संघाने त्यांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला (SA vs BAN) धमाकेदार स्टाईलने सुरुवात केली आहे (SA vs Ban). बांगलादेशने सेंच्युरियन येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 38 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. शानदार कामगिरी करणारा बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. बांगलादेशचा हा द. आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर हा पहिला विजय आहे.

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली आणि सलामीवीरांनी 95 धावांची भागीदारी केली. कर्णधार तमीम इक्बाल 41 धावांची खेळी खेळून बाद झाला, तर दुसरा सलामीवीर लिटन दास अर्धशतक झळकावून माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या शाकिबने जलद धावा केल्या आणि 64 चेंडूत 77 धावांची खेळी साकारली. आपल्या खेळीत सात चौकार आणि तीन षटकार ठोकणाऱ्या शकीबने यासिर अली (50) सोबत चौथ्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली. खालच्या क्रमवारीतील फलंदाजांनी कमी धावांचे पण महत्त्वाचे योगदान दिले आणि त्यामुळेच बांगलादेशने 7 गडी गमावून 314 धावसंख्येपर्यंत मजल मारली. द. आफ्रिकेकडून मार्को येनसेन आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. (SA vs Ban)

315 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. 18 धावांवर संघाला पहिला धक्का बसला. मालन चार धावा करून बाद झाला. यानंतर काईल वॅरेने (21) आणि मार्करम शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. अवघ्या 36 धावसंख्येवरच त्यांनी तीन विकेट गमावल्यानंतर कर्णधार टेंबा बावुमा आणि रेसी व्हॅन डर ड्युसेन यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. टेंबा बावुमा 31 धावांवर बाद झाल्याने ही भागिदारी फुटली. त्यानंतर ड्युसेनने डेव्हिड मिलर सोबत पुन्हा संघाला विजय मिळवून देण्याच्या दृष्टीने जोरदार वाटचाल सुरू केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी पाचव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी रचली. डुसेन 98 चेंडूत 86 धावा काढून 38व्या षटकात बाद झाला. याशिवाय डेव्हिड मिलरने 57 चेंडूत 79 धावांची शानदार खेळी केली. या दोघांशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला धावा करता आल्या नाहीत. अँडिले फेहलुकवायो 2, मार्को येन्सन 2, कागिसो रबाडा 1 धावा करून माघारी परतले. (SA vs Ban)

डेव्हिड मिलरची झंझावाती खेळी व्यर्थ..

डेव्हिड मिलरने 57 चेंडूत 79 धावांची झंझावती खेळीच्या जोरावर आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही 46 व्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला. सरतेशेवटी केशव महाराज (23) आणि लुंगी एनगिडी (15*) यांनीही विजयासाठी संघर्ष केला. पण त्यात त्यांना अपयश आले आणि बांगलादेशने ह सामना जिंकून इतिहास रचला. बांगलादेशकडून मेहदी हसनने सर्वाधिक चार बळी घेतले, तर तस्किन अहमदनेही तीन विकेट मिळवल्या. (SA vs Ban)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT