पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा फलंदाज ऋतुराज गायकवाड दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जखमी झाला. सामन्यात त्याच्या बोटाला दुखापत झाली. या दुखापतीमुळे कसोटी मालिकेतील निर्णायक तिसऱ्या वनडे सामन्यात तो खेळू शकला नाही. या दुखापतीमुळे तो द. आफ्रिकाविरूद्धच्या कसोटी मालिकेतील संघातून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी अभिमन्यू ईश्वरनला संघात स्थान देण्यात आली आहे. तो सध्या वैद्यकीय पथकाच्या निरिक्षणाखाली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना ऋतुराजच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. यामुळे ऋतुराज कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.
हेही वाचा :