कीव्ह; पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (russian defence minister) यांच्याशी झालेल्या जोरदार वादानंतर रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोईगु यांना हृदयविकाराचा झटका आला, असा दावा युक्रेनचे संरक्षण मंत्री अँटोन गेराश्चेंको यांनी केला आहे. पुतिन यांनी युक्रेनमधील विशेष लष्करी कारवाईच्या अपयशासाठी सर्गेईला जबाबदार धरले आहे, असेही ते म्हणाले.
यापूर्वी २४ मार्च रोजी रशियाचे संरक्षण (russian defence minister) मंत्री टीव्हीवर दिसले होते. परंतु, हे फुटेज नवीन की जुने याची स्पष्टता होऊ शकली नाही. ते अचानक गायब झाल्यानंतर अशी अटकळ होती की, खार्किव्ह किंवा कीव्ह सारखी युक्रेनियन शहरे काबीज करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल पुतिनने त्यांना शिक्षा केली होती. याबाबत रशिया राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयालाने माैन बाळगले आहे.
दरम्यान, तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तय्यप एर्दोगन यांनी नमूद केलेल्या चार मुद्यांवर रशियासोबत कोणताही करार झालेला नाही, असे युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमात्रो कुलेबा यांनी स्पष्ट केले आहे. कुलेबा यांनी सांगितले की, "तुर्कस्तानच्या अध्यक्षांनी चार मुद्द्यांचा उल्लेख केला होता. यावर रशिया सहमत झालेला नाही." यापूर्वी एर्दोगन यांनी माध्यमांना सांगितले की, मॉस्को आणि कीव हे चार मुद्यांवर सहमती होण्याजवळ पोहचले होते. या चार मुद्द्यांमध्ये युक्रेनचे NATO मध्ये प्रवेश, युक्रेनमधील दुसरी अधिकृत भाषा म्हणून रशियन भाषेला मान्यता देणे सैन्य आणि देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यांचा यामध्ये समावेश होता.
क्रिमिया (Crimea) आणि पूर्व डोनबास (Donbass) प्रदेश भविष्यातील स्थिती यावर कोणतीही सहमती होऊ शकली नाही, असे तुर्कीच्या राष्ट्रपतींनी सांगितले. शिवाय त्यांनी या विषयांवर सहमती होण्यासाठी रशिया आणि युक्रेनच्या नेत्यांची तुर्कीत बैठक घेण्याचा प्रस्ताव मांडला. यावेळी कुलेबा म्हणाले की, रशियाशी शांतता चर्चेसाठी त्यांच्या देशाच्या शिष्टमंडळाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आम्ही आमच्या मागण्यांपासून मागे हटणार नाही. युद्धविराम, सुरक्षेची हमी आणि युक्रेनच्या प्रादेशिक अखंडतेला प्रथम स्थान देण्यावर आमचा भर असल्याचे कुलेबा यांनी स्पष्ट केले हाेते.