Kristina Dmitrenko Joins Ukraine Army 
Latest

रशिया-युक्रेन युद्ध : युक्रेनियन नेमबाज “क्रिस्टीना दिमित्रेंको” युद्धभूमीवर

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क 

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारी युक्रेनियन चॅम्पियन नेमबाज क्रिस्टीना दिमित्रेंको ही २२ वर्षीय तरूणी युध्दभूमीवर उतरली आहे. रशियन सैन्याच्या आक्रमणापासून आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी ती युध्दभूमीवर आपले कौशल्य वापरताना दिसत आहे. हातात Ak-203 घेत, "मला सैनिकांवर हल्ला करण्याची भीती वाटत नाही " असे म्हणत रशियन सैन्याला तिने इशारा दिला आहे.

२०१६ च्या युवा ऑलिम्पिकमध्ये बावीस वर्षीय क्रिस्टिना दिमित्रेन्कोने बायथलॉन क्रीडाप्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये ती युक्रेनमधील कार्पेथियन पर्वतरागांमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करत होती. मात्र फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात रशियाने युक्रेनविरूद्घ पुकारलेल्या युद्धामुळे तिच्यासाठी सर्वकाही बदलले.

Kristina Dmitrenko Joins Ukraine Army

एका वृत्तवाहिनीच्या मते, क्रिस्टिना दिमित्रेन्को २७ फेब्रुवारीला स्वित्झर्लंडला आणि नंतर इटलीला स्पर्धेसाठी जाणार होती. परंतु, या युध्दादरम्यान तिची क्रीडा कारकीर्द ठप्प झाली, कारण तिला कीव आणि चेर्निहाइव्हमधील युद्धाच्या प्रसंगांचा सामना करावा लागला. यानंतर तिने युक्रेनच्या नॅशनल गार्डमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. युक्रेनच्या अंतर्गत असलेल्या फेसबुक पेजवर तिने म्हटले आहे की, " माझ्या आयुष्यात मी कधीही असं काही होईल याचा कधीच विचार देखील केला नव्हता. शत्रूचे मला कोणतेच भय नाही. मी चांगल्या प्रकारे शूट केले, जेणेकरून आक्रमकर्त्यांना कोणतीच संधी मिळणार नाही". पुढे ती " माझ्या हातात कोणतेही शस्त्र असो, मग ते स्पर्धेत अथवा सैन्यात मी शेवटपर्यंत तटस्थ उभा राहून लढत राहीन. नक्कीच आमचा विजय होईल " असंही म्हणते.

गेले तीन महिने युक्रेनमधील चाललेले हे युद्ध रशिया थांबण्याचे नाव घेत नाही आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला असून, त्यात बहुतांश सैनिकांचाही समावेश आहे. दरम्यान, युक्रेनने आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी सैन्यात नागरिकांचीही भरती करण्याची मोहीम तीव्र केली आहे. युक्रेनचे खेळाडू, अधिकारी, चित्रपट कलाकार आणि मॉडेल्सही या मोहिमेत भाग घेत आहेत.

दरम्यान युक्रेनियन सैन्याने रशियन सैन्याला खार्किव या दुसऱ्या शहरातून माघार घेण्यास भाग पाडले आहे. काही दिवसापूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की यांनी देखील सांगितले की, डोनबास प्रदेशातील परिस्थिती अत्यंत कठीण आहे, कारण रशियन सैन्याने या भागात काही प्रकारे वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचलत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT