पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध अजूनही धुमसतच आहे. नुकतेच युक्रेनने रशियावर हल्ला चढवत रशियाच्या चार विमानांना युक्रेनच्या सीमेजवळ पाडण्यात आले आहे. यासंदर्भात युक्रेनकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. वाचा सविस्तर बातमी. (Russia-Ukraine War)
रशिया आणि युक्रेनमध्ये एक वर्षाहून अधिक चाललेल्या संघर्षात दोन्ही देशांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरम्यान शनिवारी (दि.१३) ही विमान पाडण्याची घटना समोर येत आहे. रशियाच्या एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार रशियाची ही विमानं युक्रेनच्या चेर्निहाइव्ह प्रदेशावर क्षेपणास्त्र आणि बॉम्ब हल्ला (Russia-Ukraine War) करणार होते. एका अहवालात म्हंटलं आहे की, ईशान्य युक्रेनला लागून असलेल्या ब्रायन्स्क प्रदेशात Su-३४ लढाऊ विमान, Su-३५ लढाऊ विमान आणि दोन MI-८ हेलिकॉप्टर पाडण्यात आली आहेत. अद्याप युक्रेनकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
हेही वाचा