पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर मोठी जीवितहानी झाली आहे. गुरुवारी १३७ लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ३१६ जण जखमी झाले आहेत. रशियाने जमीन, समुद्र आणि हवाई मार्गाने युक्रेनवर हल्ला केला असल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण केले आहे. यानंतर ह्रॅकर्स ग्रुप ॲनोनिमसनने (Anonymos) रशियन सरकारवर 'सायबर युद्ध' घोषित केले. रशियन सशस्त्र सेना युक्रेनच्या राजधानीत मोठ्या प्रमाणावर बॉम्बफेक ऑपरेशनची तयारी करत आहेत. या विरोधी ॲनोनिमस (Anonymos ) हॅकर्सच्या गटाने रशियावर "सायबर युद्ध" सुरु केल्याचे टिृट केले आहे.
ॲनोनिमस (Anonymos) ही एक विकेंद्रित आंतरराष्ट्रीय कार्यकर्ता आणि हॅकटिव्हिस्ट कलेक्टीव्ह चळवळ म्हणून कार्यरत आहे. जी प्रामुख्याने सरकारी संस्था, कॉर्पोरेशन आणि चर्च ऑफ सायंटोलॉजी विरुद्ध विविध सायबर हल्ल्यांसाठी ओळखली जाते. रशियन सरकारची वेबसाईट, सुरक्षा मंत्रालयासारख्या वेबसाईट्स बंद केल्या आहेत. तसेच अनेक महत्त्वाच्या वेबसाईट्स बंद झाल्या आहेत. यामूळे रशियन सरकारला याचा माेठे नुकसान झाले आहे.
हे ही वाचलं का