RSA vs IND 1st T20I  
Latest

RSA vs IND 1st T20I : पावसाची बॅटिंग सुरुच, टॉसला विलंब

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण यांच्या दरम्यान, होणाऱ्या टी२० मालिकेला आज (दि.१२) सुरुवात होणार होती. मात्र, पावसामुळे अद्याप नाणेफेकही होऊ शकलेली नाही. मालिकेतील पहिला सामना डर्बनच्या किंग्समेड क्रिकेट स्टेडियमवर होणार असून, भारतीय संघ या मालिकेत पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. (RSA vs IND 1st T20I) भारतीय संघात युवा खेळाडूंचा भरणा असला, तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आराम करणारे शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा हे संघात परतले आहेत. दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व एडन मार्कराम याच्याकडे आहे.

पिच रिपोर्ट (RSA vs IND, 1st T20I)

डर्बनच्या किंग्समेडची खेळपट्टी जगातील सर्वात वेगवान समजली जाते. येथे वेगवान गोलंदाजाची हवा असते. परंतु, धावाही मोठ्या प्रमाणात होतात. तीन महिन्यांपूर्वी येथे ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी-२० सामने झाले. यात तीनवेळा १९० च्या पुढे धावा झाल्या होत्या. येथे पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ १८० च्या पुढे धावा करू शकला, तर त्यांना विजयाची जास्त संधी असते. येथे पहिल्यांदा खेळणाऱ्या संघाची १५३ सरासरी आहे. (RSA vs IND 1st T20I)

दक्षिण आफ्रिकेचा संघ : एडन मार्कराम (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झके, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, जेराल्ड कोएत्झी, नांद्रे बर्गर, तबरेझ शम्सी, ओटनीएल बार्टमन, मार्को जॅन्सन, डोनोव्हान विल्यम फेरेरा (RSA vs IND 1st T20I)

भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, जितेश शर्मा, रवींद्र जडेजा, दीपक चहर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, इशान किशन, मुकेश कुमार, वॉशिंग्टन सुंदर, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा , कुलदीप यादव (RSA vs IND 1st T20I)

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT