पुढारी ऑनलाईन डेस्क : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात गुरुवारी (दि. १९ जानेवारी) होणारा पॅरिस सेंट जर्मन (PSG) विरुद्ध रियाध ST-11 सामना पाहण्यासाठी एका उद्योगपतीने $2.6 दशलक्ष म्हणजेच सुमारे 21.24 कोटी रुपयांचे विशेष तिकीट खरेदी केले आहे. मुशर्रफ अल घमदी असे त्यांचे नाव आहे. लिलावाद्वारे त्यांनी हे तिकीट खरेदी केले आहे. (Ronaldo vs Messi match)
पॅरिस सेंट जर्मेन (PSG) विरुद्ध रियाध ST-11 सामन्यासाठी खास तिकीट लिलावासाठी ठेवण्यात आले होते. जो व्यक्ती हे तिकिट विकत घेईल त्याला खेळाडूंना भेटण्याची संधी देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. यासोबतच तो खेळाडूंसोबत फोटोही काढू शकतो. या तिकिटातून मिळणारी रक्कम धर्मादाय संस्थांना देण्य़ात येणार आहे. (Ronaldo vs Messi match)
लिओनेल मेस्सी फ्रेंच हा फुटबॉल क्लब पॅरिस सेंट जर्मनकडून खेळतो. तर ख्रिस्तियानो रोनाल्डो या वर्षीपासून सौदी अरेबियाच्या अल नसर क्लबकडून खेळणार आहे. रियाधच्या या फुटबॉल क्लबने त्याच शहरातील दुसर्या क्लब अल हिलालच्या सहकार्याने रियाध एसटी-11 संघाची घोषणा केली आहे. या संघाचा सामना गुरुवारी पीएसजीसोबत होणार आहे. अशा स्थितीत फुटबॉल विश्वातील दोन महान खेळाडूंना पाहण्यासाठी खास तिकीट लिलावासाठी ठेवण्यात आले होते. उद्योगपती मुशर्रफ अल घमदी यांनी $2.6 दशलक्ष म्हणजेच सुमारे 21.24 कोटी रुपयांचे विशेष तिकीट खरेदी केले आहे.
गुरुवारी रियाधमध्ये होणारा हा सामना पाहण्यासाठी तिकिटाची मागणी मोठ्या प्रमाणावर होती. एकूण 20 लाखांहून अधिक जण तिकिटाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र केवळ ७० हजार प्रेक्षकांनाच हा सामना पाहण्याची संधी मिळणार आहे.
हेही वाचा;