Ronaldo-Messi  
Latest

Ronaldo-Messi : बुद्धिबळ खेळताना रोनाल्डो-मेस्सीचा फोटो व्हायरल; विराट कोहलीने दिली ‘ही’ कमेंट

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून कतारमध्ये सुरूवात होत आहे. स्पर्धेसाठी सर्व ३२ संघ कतारला पोहोचले आहेत. विश्वचषकाच्या एक दिवस आधी क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये दोघे बुद्धिबळ खेळताना दिसत आहेत. या फोटोला करोडो लाईक्स मिळाल्या आहेत. इतकेच नाही तर टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली यानेही या फोटोला कमेंट केली आहे.

पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी हे सध्या सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणले जातात. दोघेही दिग्गज असून या दोघांचा हा शेवटचा विश्वचषक असल्याचे मानले जात आहे. विश्वचषकापूर्वी एक विशेष फोटोशूट झाले. ज्यामध्ये दोघे एकत्र आले आहेत. लुई व्हिटॉनने प्रायोजित केलेल्या या फोटोशूटमध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी एकत्र बुद्धिबळ खेळताना दिसत आहेत. दोघांनीही इंस्टाग्रामवर हा फोटो पोस्ट केला आहे.

हा फोटो शेअर करताना, दोन्ही खेळाडूंनी एकच कॅप्शन दिले आहे. कॅप्शनमध्ये 'विजय ही फक्त मनाची स्थिती आहे' असे लिहीले आहे. क्रिस्टियानो रोनाल्डोने पोस्ट केलेल्या फोटोला २४ तासांत सुमारे ३० करोड लाईक्स मिळाल्या आहेत, तर लिओनेल मेस्सीच्या पोस्टला २५ करोडपेक्षा अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. रोनाल्डोच्या पोस्टवर विराट कोहलीने 'काय चित्र आहे' अशी कमेंट दिली आहे. कोहलीच्या या कमेंटलाही हजारो लोकांनी लाईक केले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT