Rohit vs Siraj : रोहित शर्माची मोहम्मद सिराजला थप्पड, Video व्हायरल 
Latest

Rohit vs Siraj : रोहित शर्माची मोहम्मद सिराजला थप्पड, Video व्हायरल

रणजित गायकवाड

जयपूर; पुढारी ऑनलाईन : Rohit vs Siraj : रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराज यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर हात उचलल्याचे दिसत आहे. रोहितने सिराजला डोक्यात जोराचा फटका लगावलाचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. भारतीय संघ न्यूझीलंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना रोहित, सिराज डगआऊटमध्ये बसले होते. सर्व खेळाडू एकमेकांशी बोलत होते. अचानक रोहित सिराजला फटकावताना दिसला.

हा प्रसंग घडला तेव्हा सिराजच्या शेजारी केएल राहुल बसला होता. तर त्याच्या मागिल रांगेत रोहित बसला होता. काहीतरी संभाषण झाल्यानंतर रोहितने सिराजला मागून डोक्यात जोरात फटका लगावला. यावेळी सिराजच्या पुढच्या रांगेत प्रशिक्षक राहुल द्रविड बसल्याचे दिसत आहे.

कॅमेरामनने ही संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. काही वेळाने हा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओ पाहून रोहित सिराजच्या डोक्यात जोराचा फटका लगावताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान सिराजचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तो कुलदीप यादवचा गळा पकडताना दिसत होता.

सामन्यात सिराजला दुखापत…

पहिल्या T20 सामन्यादरम्यान मोहम्मद सिराज गंभीर जखमी झाला होता. तो वेदनेने ओरडताना दिसत होता. जखम इतकी होती की त्याच्या हातातून रक्त वाहू लागले. फिजिओला लगेच मैदानावर बोलावावे लागले. न्यूझीलंडच्या डावाच्या शेवटच्या षटकात ही घटना घडली. नंतर तो पट्टी बांधून गोलंदाजी करताना दिसला. त्याने ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर रचिन रवींद्रची विकेटही घेतली.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद सिराजने शेवटच्या षटकात फक्त 7 धावा दिल्या. पहिल्या तीन षटकांत त्याची गोलंदाजी काही खास नव्हती. या सामन्यात त्याने ४ षटकात ३९ धावा दिल्या. त्याला एकही विकेट मिळाली नाही. सिराजची T20 वर्ल्ड कपमध्ये निवड झाली नव्हती. आयपीएलमध्ये तो सातत्याने गोलंदाजी करत होता. असे असतानाही त्याचा संघात समावेश करण्यात आला नाही. या निर्णयावर अनेक दिग्गज खेळाडूंनी प्रश्न उपस्थित केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT