पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय T-20 संघात सध्या युवा खेळाडूंना संधी दिली जात आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी खेळाडूंना गेल्या T20 विश्वचषकापासून या फॉरमॅटमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. रोहित आणि कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. रोहितच्या जागी हार्दिक पांड्या टी-20 संघाचे नेतृत्व करत आहे. भारताचे दोन दिग्गज खेळाडू केवळ एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळत आहेत. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित एकदिवसीय विश्वचषकानंतर टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेईल, अशीही मोठी शक्यता आहे. (Rohit Sharma Retierment)
याबाबत टी-20 फॉरमॅट सोडण्याचा विचार करत नसल्याचे खुद्द रोहितने स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये रोहित 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपबद्दल बोलताना दिसत आहे. आगामी २०२४ T-20 विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. अमेरिकेतील कार्यक्रमात रोहितने सांगितले की, आगामी टी-20 विश्वचषकसाठी उत्सुक आहे. (Rohit Sharma Retierment)
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रोहित म्हणाला, "अमेरिकेत केवळ आनंद घेण्यासाठी आलो नाहीत. इथे येण्याचे आणखी एक कारण आहे. तुम्हाला माहिती आहे का येथे विश्वचषक आहे. जून २०२४ मध्ये येथे टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. मला खात्री आहे. प्रत्येकजण उत्सुक आहे. आम्ही त्याची वाट पाहत आहोत."
हेही वाचा;