पुढारी ऑनलाईन डेस्क : वन-डे वर्ल्डकपमध्ये भारताचा सहावा सामना इंग्लंडशी लखनौच्या एकाना स्टेडियमवर होत आहे. या लढतीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा दोन विक्रम नोंदवले आहेत. सध्याच्या वर्ल्डकपमध्ये रोहित कर्णधार आणि फलंदाज म्हणून चमकदार कामगिरी करत आहे. भारतीय संघाला इंग्लंडला पराभूत करून विश्वचषकात विजयाचा षटकार मारायचा आहे. टीम इंडियाच्या सलग पाच विजयांमध्ये कर्णधार रोहितने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. (Rohit Sharma Record)
टीम इंडिया इंग्लंडला पराभूत करून उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी प्रयत्नशील आहे. रोहित शर्माने या सामन्यात 18000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या आहेत. आजच्या सामन्यात 47 धावा करताच हा विक्रम त्याने आपल्या नावे केला. त्याने आतापर्यंत 456 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 43.36 च्या सरासरीने 18000 धावा पूर्ण केल्या आहेत. यामध्ये 52 कसोटीत 3677तर 257 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 10472 धावा केल्या आहेत. रोहितने 148 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3853 धावा फटकावल्या आहेत.
हा विक्रम आपल्या नावावर केल्यामुळे रोहितने दिग्गज सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांच्या क्लबमध्ये आपले एन्ट्री केली आहे. आतापर्यंत भारताच्या पाच फलंदाजांनी 18 हजार किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील विश्वचषक 2023 मधील 29 वा सामना लखनौच्या एकना स्टेडियमवर होत आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर अनोख्या शतकी विक्रमाची नोंद झाली आहे. कर्णधार म्हणून रोहित शर्मा याचा हा 100 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. (सर्व फॉरमॅट) कर्णधारपदाचे शतक झळकवणर तो भारताचा सातवा खेळाडू ठराला आहे. त्याच्या आधी महेंद्रसिंग धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, विराट कोहली, सौरव गांगुली, कपिल देव आणि राहुल द्रविड यांनी ही कामगिरी केली आहे. यासह 100 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार करणारा रोहित जगातील 50 वा खेळाडू ठरला आहे.
हेही वाचा :