Rohit Sharma : रोहित शर्मा बनला ‘सिक्सर किंग’, मोडला शाहिद आफ्रिदीचा मोठा विक्रम 
Latest

Rohit Sharma : रोहित शर्मा बनला ‘सिक्सर किंग’, मोडला शाहिद आफ्रिदीचा मोठा विक्रम

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Most sixes in international cricket : भारतीय क्रिकेट संघाने पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे शनिवारी (6 ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या या सामन्यात 59 धावांनी विजय मिळवत मालिकेत 3-1 ने विजयी आघाडी घेतली. मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना रविवारी (7 ऑगस्ट) याच मैदानावर खेळवला जाणार आहे. शनिवारच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 5 बाद 191 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा डाव 19.1 षटकांत 132 धावांवर आटोपला. भारताकडून ऋषभ पंतने 44 धावा केल्या. त्याचबरोबर गोलंदाजीत अर्शदीप सिंगने सर्वाधिक तीन बळी घेतले. तर आवेश खान, अक्षर पटेल, रवी बिश्णोईने प्रत्येकी 2-2 विकेट पटकावल्या.

वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टीम इंडियासाठी 33 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीदरम्यान 16 चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकार ठोकले.

रोहितने मोडला शाहीद आफ्रिदीचा विक्रम

33 धावांच्या या खेळीदरम्यान रोहितने (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी कामगिरीची नोंद केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा रोहित जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडला मोडीत काढला आहे. रोहितच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 477 षटकार आहेत. त्याचबरोबर आफ्रिदीच्या नावावर 476 षटकार आहेत.

रोहितलाच्या पुढे आता फक्त ख्रिस गेल

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा झंझावाती सलामीवीर ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत 553 षटकार ठोकले आहेत. रोहितला (Rohit Sharma) आता गेल याला मागे टाकण्याचे संधी आहे. गेल सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून दूर आहे. तर रोहित ॲक्टीव्ह आहे. अशा स्थितीत रोहित लवकरच गेलला मागे टाकू शकतो. न्यूझीलंडचा माजी सलामीवीर ब्रेंडन मॅक्युलमच्या नावावर 398 आंतरराष्ट्रीय षटकार आहेत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT