Latest

रोहित पवारांचे भरपावसात आंदोलन; अजित पवार म्हणाले…

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज (दि.२४) भरपावसात विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलनला बसले आहेत. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत बोलताना म्हणाले की, पावसाळी अधिवेशनात यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. अधिवेशन अजून संपलेलं नाही, फक्त एक आठवडा झाला आहे. लोकप्रतिनिधींनी  निवेदन दिल्यावर त्या एमआयडीसीचे चेअरमन आणि मंत्र्यांनी पत्र दिल्यानंतर त्याची गंभीर दखल घ्यायला हवी. अशा पद्धतीने आंदोलनाला बसणे योग्य नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

सरकारने कर्जत- जामखेड येथील एमआयडीसीला मंजूरी रोखल्याच्या निषेधार्थ रोहीत पवार यांनी हे आंदोलन करत आहेत. 'दबावाच्या राजकारणाला बळी पडणाऱ्या सरकारचा धिक्कार!' असा फलक हातात घेवून त्यांनी सरकारचा निषेध केला. माझ्या मतदारसंघातील एमआयडीसीचा प्रश्न आश्वासन देऊनही सरकार मार्गी लावत नाही. सरकार दबावाच्या राजकारणाला बळी पडत आहे. उपोषण हाच आता अखेरचा पर्याय आहे, असे रोहीत पवार यांनी म्हटले आहे. एमआयडीसीला मंजुरी मिळाली पाहीजे, कर्जत जामखेडच्या तरूणांना रोजगार मिळाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT