Latest

पाकिस्‍तानचा क्रिकेटपटू रिझवानचे इस्रायल-हमास युद्धावर भाष्‍य; म्‍हणाला, “पाकिस्तानचा विजय…”

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवानने ( Muhammad Rizwan ) बुधवारी विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेवरील पाकिस्तानच्या मोठ्या विजयानंतर इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धावर भाष्‍य केले. त्याने आपल्या संघाची श्रीलंकेविरुद्धची विक्रमी कामगिरी गाझावासीयांना समर्पित केली आहे.

Rizwan : पाकिस्‍तानचा विजय हा गाझामधील आमच्या बंधू-भगिनींसाठी

हैदराबादमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ गडी गमावून ३४४ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने ४८.२ षटकांत चार विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. रिझवानने १३१ धावांची नाबाद खेळी केली होती. या सामन्‍यानंतर रिझवानने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केली. यामध्‍ये त्‍याने म्‍हटलं आहे की, श्रीलंकेवरील पाकिस्‍तानचा विजय हा गाझामधील आमच्या बंधू-भगिनींसाठी आहे. विजयात योगदान दिल्याबद्दल आनंद झाला. संपूर्ण टीमला आणि विशेषत: अब्दुल्ला शफीक आणि हसन अलीला श्रेय देतो की ते सोपे केले. हैदराबादच्या लोकांचे अद्‌भुत स्वागत आणि पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.  ( Muhammad Rizwan )

पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध विक्रमी धावांचा पाठलाग केला

रिझवान व्यतिरिक्त, तरुण अब्दुल्ला शफीक (113) यांनी पहिले एकदिवसीय शतक झळकावून पाकिस्तानला मंगळवारी हैदराबादमध्ये श्रीलंकेविरुद्ध 345 धावांचे जागतिक विक्रमी लक्ष्य गाठण्यात मदत केली. रिजवान आणि शफीकने तिसऱ्या विकेटसाठी १७६ धावांची भागीदारी केली. या दोघांच्‍या खेळीने पाकिस्तानला ४८.२ षटकांत विजय मिळवून दिला. विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग होता. आयर्लंडने यापूर्वी एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम केला होता, जेव्हा त्यांनी २०११ च्या भारतात झालेल्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध ३२९ धावांचे यशस्वी पाठलाग केले होते.  ( Muhammad Rizwan )

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT