राजकोट; पुढारी ऑनलाईन : शेष भारत (Rest of India)संघाने सौराष्ट्रला (Saurashtra) नमवत इराणी चषकावर (Irani Tophy 2022 ) आपले नाव कोरले आहे. शेष भारतने सौरष्ट्रचा ८ विकेट्सनी पराभव करत स्पर्धेत सर्वश्रेष्ठ ठरले. चौथ्या डावात शेष भारतला १०५ धावांचे लक्ष गाठायचे होते. दोन फलंदाजाच्या मोबदल्यात अत्यंत सहजपणे शेष भारत संघाने विजय संपादन केले. जलदगती गोलंदाज मुकेश कुमार यास प्लेअर 'ऑफ द मॅच'च्या किताबाने सन्मानित करण्यात आले. त्याने ७२ धावा देत ५ बळी मिळविण्याची कामगिरी नोंदवली.( Rest of India vs Saurashtra)
राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात नाणेफक जिंकत शेष भारत संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेष भारत संघाचा कर्णधार हनुमा विहारीचा हा निर्णय अत्यंत सार्थकी लागला. शेष भारत संघाच्या गोलंदाजांनी पहिल्याच दिवसात सौराष्ट्रच्या संपूर्ण संघास केवळ ९८ धावात गुंडाळले. पहिल्या डावात शेष भारत संघाकडून मुकेश कुमारने ४ तर कुलदीप सेन व उमरान मलिक यांनी प्रत्येक ३ बळी मिळवले.
शेष भारताच्या पहिल्या डावाची सुरुवात देखील अडखळत झाली. फक्त १८ धावांमध्ये त्यांनी आपले ३ फलंदाज गमावले. त्यानंतर कर्णधार हनुमा विहारी (८२) आणि सरफराज खान (१३८) यांच्या दमदार खेळीने संघाला एका मजबूत लक्षापर्यंत पोहचवले. याशिवाय जयंत यादव (३७) आणि सौरभ कुमार (५५) यांनी जबाबदारी पूर्ण खेळी केली. शेष भारतचा पहिला डाव ३७४ धावांवर आटोपला. सौराष्ट्रकडून गोलंदाज चेतन सकारिया याने ५ तर उनाडकट आणि चराग यांनी प्रत्येकी २ बळी घेण्यात यशस्वी झाले.
कुलदीप सेनचा प्रभावी मारा (Irani Tophy 2022 )
दुसऱ्या डावात पुन्हा सौरष्ट्रची तारांबळ उडाली. केवळ ८७ धावांमध्ये त्यांनी आपले ५ विकेट्स गमावले. चेतेश्वर पुजारा पहिल्या डावा प्रमाणे दुसऱ्या डावात देखील अपयशी ठरला. तेथून शल्डन जॅक्सन (७१), अर्पित वसावडा(५५), प्रेरक मांकड(७२) आणि जयदेव उनाडकट (८९) यांनी संघाला ३५० पर्यंत पोहचवले. सौराष्ट्रचा दुसरा डाव ३८० धावांवर संपला. शेष भारतकडून कुलदीप सेन याने ५ तर सौरभ कुमार ३ आणि मुकेश कुमार व जयंत यादव यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला.
८ विकेट्स राखून जिंकला सामना
शेष भारतला दुसऱ्या डावात फक्त १०५ धावांची आवश्यकता होती. संघाने प्रियंक पांचाल (२) आणि यश ढूल (८) या फलंदाजांना लवकर गमावले. पण त्यानंतर अभिमन्यू ईश्वरन (६३) आणि श्रीकर भरत (२७) यांनी नाबाद भागिदारी रचत आपल्या संघाला ६ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
अधिक वाचा :