Latest

बंडखोर आमदारांची स्वारी हेलिकॉप्टरने राजभवनवर उतरणार, भाजपची मानवी साखळी देणार संरक्षण

दीपक दि. भांदिगरे

मुंबई : दिलीप सपाटे; शिवसेना बंडखोर आमदार मुंबईत आल्यानंतर त्यांना शिवसैनिकांकडून काही धोका होऊ नये म्हणून भाजपकडून वेगळी रणनिती आखण्यात आली आहे. हे आमदार गोव्यातून विमानाने मुंबईत आल्यानंतर ते तेथून हेलिकॉप्टरने राजभवनावर उतरणार आहेत. तर राजभवन ते विधानभवन अशी मानवी साखळी करून भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते त्यांचे संरक्षण करणार असल्याचे समजते.

ठाकरे सरकारची उद्या बहुमत चाचणी होणार आहे. या बहुमत चाचणीसाठी आपल्या समर्थक आमदारांसह उद्या आपण मुंबईला येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. मात्र, शिवसेनेकडून मुंबईत आल्यानंतर धडा शिकवण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. राज्यात काही ठिकाणी बंडखोर आमदारांची कार्यालये आणि फलकांना शिवसैनिकांनी लक्ष्य केले आहे. त्यामुळे उद्या मुंबईत शिवसैनिक राडा करणारच नाहीत असे सांगता येत नाही. म्हणून या आमदारांना सुरक्षित विधानभवनात आणण्यासाठी वेगळी रणनिती आखण्यात आली आहे.

हे आमदार विशेष विमानाने मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांना बस किंवा गाड्यांनी विधानभवनात आणण्याऐवजी तेथून त्यांना हेलिकॉप्टरमधून राजभवनवर आणले जाऊ शकते. भाजपने राजभवन ते विधानभवन या मार्गावर मानवी साखळी उभारत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे हे आमदार राजभवनवरच उतरतील, हे स्पष्ट होत आहे.

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT