Latest

Ravindra Jadeja 100 Wickets : रवींद्र जडेजाचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर बळींचे ‘शतक’, जाणून घ्या आकडेवारी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ravindra Jadeja 100 Wickets : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील 5 व्या सामन्यात रविवारी (8 ऑक्टोबर) यजमान भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने आहेत. या सामन्यात कांगारू संघाने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईत खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा आपल्या फिरकीच्या जोरावर कांगारू फलंदाजांना चांगलेच नाचवले. यादरम्यान त्याने महत्त्वाच्या तीन विकेट्स घेऊन पाहुण्या संघाचे कंबरडे मोडले. त्याचबरोबर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय बळींचे शतक पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे.

जड्डूने या सामन्यात एकूण 10 षटकांचा कोटा पूर्ण केला. यातील दोन षटके तर निर्धाव टाकली आणि 28 धावांच्या मोबदल्यात स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, ॲलेक्स कॅरी या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. 28व्या षटकाच्या दुस-या चेंडूवर जडेजाने स्टीव्ह स्मिथला बोल्ड केले. चेंडू कधी खेळपट्टीवर पडला आणि विकेटमध्ये शिरला याचे भानही हे स्मिथला कळेच नाही. बाद झाल्यानंतर तो अस्वस्थ दिसत होता. दरम्यान, या विकेट्ससह जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय बळींचे शतक पूर्ण केले. (Ravindra Jadeja 100 Wickets)

अनुभवी स्मिथला या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही आणि त्याने 71 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 46 धावांची मौल्यवान खेळी केली. या सामन्यात स्टीव्ह स्मिथकडून अनेकांना मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती पण जडेजासमोर तो अपयशी ठरला. (Ravindra Jadeja 100 Wickets)

जडेजाकडून 10 चेंडूत 3 शिकार (Ravindra Jadeja 100 Wickets)

रवींद्र जडेजा इथेच थांबला नाही. त्याने त्याच्या पुढच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लाबुशेनला बाद केले. राहुलने विकेटच्या मागे त्याचा झेल पकडला. यानंतर चौथ्या चेंडूवर त्याने यष्टीरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरीला शून्यावर बाद करून माघारी धाडले.

वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 विकेट घेणारा जडेजा दुसरा भारतीय

वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 विकेट घेणारा जडेजा दुसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी 1987 मध्ये मनिंदर सिंग यांनी ही कामगिरी केली होती. त्या सामन्यात सिंग यांनी 34 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या.

हरभजनच्या 105 विकेट (Ravindra Jadeja 100 Wickets)

स्टुअर्ट ब्रॉडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स (128) घेतल्या आहेत. या यादीत ब्रॉडनंतर हरभजन सिंग (105) आणि रवींद्र जडेजा आहेत. दोघांनी मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्व फॉरमॅटमध्ये 100 विकेट घेण्याची किमया केली आहे.

घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध जडेजाची गोलंदाजी

जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 12 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 18.28 च्या सरासरीने 71 विकेट्स घेतल्या आहेत. टीम इंडियाच्या या अष्टपैलूने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशातील 2 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 1 बळी घेतला आहे. तर आजच्या सामन्यापूर्वी (8 ऑक्टोबर) जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये 41.62 च्या सरासरीने 27 विकेट घेतल्या होत्या. अशाप्रकारे स्मिथची विकेट घेताच त्याने विकेटचे शतक पूर्ण केले.

जडेजाची वनडेतील कामगिरी

जडेजाने 8 फेब्रुवारी 2009 रोजी श्रीलंके विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 186 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या काळात जडेजाने 126 डावांमध्ये 32.11 च्या सरासरीने आणि 84.28 च्या स्ट्राईक रेटने 2,601 धावा केल्या आहेत. यासह त्याने 178 डावांमध्ये 4.92 च्या इकॉनॉमीसह 204 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सरासरी 36.95 राहिली आहे. तसेच गोलंदाजीदरम्यान 36 धावांत 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT