Latest

विराट कोहली-सौरव गांगुली वादात रवी शास्‍त्रींची एन्‍ट्री!, म्‍हणाले…

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्‍यातील वाद इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल ) दरम्‍यान चव्‍हाट्यावर आला आहे. दिल्‍ली कॅपिटल्‍स संघाचे संचालक सौरव गांगुली आणि रॉयल चलेंजर्स बंगलोर संघाचा फलंदाज विराट काहली यांनी एकमेकांना टाळल्‍याचा व्‍हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्‍हायरल झाला होता. आता या वादात टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक शास्‍त्री यांनी उडी घेतली आहे. ( kohali vs ganguly )

 kohali vs  ganguly: रवी शास्‍त्रींना विचारण्‍यात आलेला प्रश्‍न

तुमच्याकडे खेळाडू X आणि खेळाडू Y आहे. Player X हा एक महान भारतीय खेळाडू, माजी कर्णधार आणि दिग्गज आहे. प्लेअर वाई हा एक महान भारतीय खेळाडू, माजी कर्णधार आहे. तो अजूनही खेळत आहे. X आता एका संघाचा संचालक आहे आणि Y दुसऱ्या संघासाठी शानदार फलंदाजी करत आहे. X आणि Y ला वाटते की काहीतरी घडले आहे आणि ते आता एकमेकांना आवडत नाहीत. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांनी हस्तांदोलन केले. X आणि Y पैकी एकाने हस्तांदोलन टाळण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही एकमेकांशी बोलायचे नव्हते. तू X आणि Y शी बोलशील का? तुम्ही त्यांना काही सल्ला द्याल का?, असा सवाल ESPNcricinfo च्या शोमध्ये रवी शास्त्री यांना करण्‍यात आला होता.

virat kohali vs sourve ganguly: शास्‍त्रींनी दिले उत्तर

गांगुली आणि कोहली यांच्‍याबद्‍दल अप्रत्‍यक्ष प्रश्‍नाला रवी शास्‍त्री याने स्‍पष्‍ट उत्तर देणे टाळले. ते म्‍हणाला, शेवटी माझे नाते कसे आहे यावर सारं काही अवलंबून असेल. तुम्‍हाला माझ्‍याशी अजिबातच बोलायचे नसेल तर मी सोडून देईन. तुमचे वय कितीही असले तरीही पुढे जाण्यासाठी नेहमीच जागा असते, असे कोड्यातच उत्तर देत शास्‍त्रींनी यावर स्‍पष्‍ट उत्तर देणे टाळले. मात्र दोघांनाही अप्रत्‍यक्ष सल्‍ला मात्र दिला.

विराट-सौरव वादाचे कारण काय?

२०२१ मध्‍ये विराट कोहली याने वनडे आणि टी-२० कर्णधारपदावरुन हटविण्‍यात आले होते. यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय ) तत्‍कालीन अध्‍यक्ष सौरव गांगुली यांनी माध्‍यमांशी बोलताना म्‍हणाले होते की, "कर्णधारपद सोडण्‍याबाबत कोहलीशी बोलणे झाले होते आणि त्याच्या संमतीनंतर ते झाले. तसेच टी-२० फॉर्मेटमध्‍ये विराट यानेच भारतीय संघाचे नेतृत्‍व करावे असे स्‍पष्‍ट केले होते. मात्र त्‍याने ते मान्‍य केले नाही आणि राजीनामा दिला". त्याचवेळी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दोन वेगवेगळे कर्णधार ठेवण्याचा निर्णय निवडकर्त्यांना आवडला नाही. यानंतर त्याने चेतन शर्मासोबत विराटशी संवाद साधला. त्यानंतरच रोहितला वनडे कर्णधार बनवण्यात आले, असेही गांगुली यांनी सांगितले होते.

गांगुलीचे विधान चुकीचे असल्‍याचा विराटने केला होता आरोप

यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना विराट कोहलीने सांगितले की, त्याला बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी ९० मिनिटांपूर्वी सांगितले होते की, आता त्याच्या जागी रोहित वनडे संघाचा कर्णधार असेल. यापूर्वी बीसीसीआयने त्याच्याशी कोणतीही चर्चा केली नव्हती. जेव्हा मी टी-20 चे कर्णधारपद सोडले तेव्हा मी पहिल्यांदा बीसीसीआयमध्ये गेलो होतो. त्यांना त्यांच्या निर्णयाची माहिती देण्यात आली. मी माझे विचार आणि चिंता मांडल्या. मंडळाने ते मान्य करून माझ्या अडचणी समजून घेतल्या. एकदाही त्यांनी मला माझ्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले नाही, असाही दावा कोहलीने केला होता.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT