नॅशनल क्रशचा टॅग मिळवलेली साउथ फिल्म अभिनेत्री रश्मिका मंदन्ना (rashmika mandanna) आजकाल खूप चर्चेत आहे. फिल्मस्टार रश्मिका मंदन्नाचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. यामुळेच अभिनेत्रीची क्रेझ तरुण पिढीवर चांगलीच झाली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्सच्या सर्वात प्रभावशाली सोशल मीडिया साऊथ स्टार्सच्या यादीत अभिनेत्री रश्मिका मंदन्नाने मोठ्या स्टार्सला धूळ चारली आहे.
अभिनेत्री रश्मिका मंदन्ना या यादीत अव्वल स्थानावर आहे. रश्मिकाला फोर्ब्सने सर्वाधिक 9.88 रेटिंग दिले आहे.
स्टार विजय देवरकोंडा या यादीत अभिनेत्री रश्मिका मंदन्नापेक्षा काही पावले मागे आहे. अभिनेत्याला या यादीत 9.67 रेटिंग मिळाले आहे.
कन्नड सुपरस्टार यशला या यादीत 9.54 रेटिंग मिळाले आहे. ज्यामुळे केजीएफ 2 स्टार या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूला 9.49 रेटिंग मिळाले आहे. ती या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
पुष्पा स्टार अल्लू अर्जुन या यादीत पाचव्या स्थानावर आहे. ज्याला 9.46 रेटिंग मिळाले आहे.
मल्याळम चित्रपट स्टार दुल्कर सलमान या यादीत सहाव्या स्थानावर आहे. दुल्कर सलमानला 9.42 रेटिंग मिळाले आहे.
अभिनेत्री पूजा हेगडे या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. फोर्ब्सने तिला 9.41 रेटिंग दिले आहे.
सोशल मीडिया प्रभावी स्टार्सच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. त्याला 9.40 रेटिंग मिळाले आहे.
या यादीत फिल्म स्टार सुर्याला 9.37 रेटिंग मिळाले आहे. या यादीत तो नवव्या स्थानावर आहे.
फिल्म स्टार तमन्ना भाटिया या यादीत शेवटच्या स्थानावर आहे. फोर्ब्सने अभिनेत्रीला 9.36 रेटिंग दिले आहे.
हे ही वाचलं का?