पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवुडमधील प्रसिध्द अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh Style) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतोच. तो त्याच्या अभिनयामुळे जेवढा चर्चेत असतो तेवढाच तो आपल्या अतरंगी अशा हेअरस्टाईल आणि ड्रेसस्टाईलमूळे नेहमी चर्चेत असतो.
प्रसिध्द अभिनेता रणवीर सिंहच्या अतरंगी लुकवर त्याचे चाहते जेवढे प्रेम करतात तेवढेच त्याला सोशल मीडियावर ट्रोलही करतात. रणवीरने नुकतच हटके अशी ड्सेस्टाईल केलेला फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्याच्या या लुकने नेटकऱ्यांचे लक्ष वेधुन घेतले आहे. त्याच्या चाहत्यांनी कॉमेंटसचा वर्षाव केला आहे. भन्नाट अशा कॉमेंट केल्या आहेत.
त्याने या लुकमध्ये रणवीरने पोपटी रंगाची पॅन्ट घातली आहे. त्यावर कार्टून असलेला टी शर्ट आणि त्यावर जॅकेट घातले आहे. केसात त्याने लाल रंगाचा बेल्ट आणि गॉगल घातला आहे. त्याचा हा फोटो पाहून एका चाहत्यांनी कॉमेंट केली आहे की, भाई बुरा मत मानो बिल्कुल बंदर लग रहे हो, अच्छे दिख रहे हो, ही दुबईची शॉपिंग आहे अशा एका पेक्षा एक भन्नाट कॉमेंट केल्या आहेत. या अगोदरही अनेकवेळा रणवीर सोशल मिडीयावर ट्रोल झाला आहे.
Ranveer Singh Style बॅंड बाजा बारात या चित्रपटातून आपल्या अभिनय करियरला सूरूवात केलेल्या रणवीर सिंहला एनर्जी का पॉवर हाऊस म्हणूनही ओळखळे जाते. रणवीरला बाजीराव मस्तानी, गोलियों की रासलीला रामलीला, गुंडे यासारख्या चित्रपटांनी यशाच्या शिखरावर नेले.
हेही वाचलंत का?