पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेट हा खेळच असा आहे की, येथे प्रत्येक दिवशी नवा विक्रम बनतो आणि भूतकाळातील काही विक्रमही मोडीत निघतात. असाच एक नवा विक्रम रणजी करंडक स्पर्धेतील ( Ranji trophy ) उपांत्यपूर्व फेरीत मुंबई संघाच्या नावावर आज नाेंदला गेला. मुंबईने उत्तराखंड संघाचा तब्बल ७२५ धावांनी पराभव करत प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ( फर्स्ट क्लास क्रिकेट ) तब्बल ९२ वर्षांपूर्वीचा विक्रम माेडित काढला. १९३० मध्ये ऑस्ट्रेलियात न्यू साउथ वेल्स संघाने क्वींसलँड संघाला ८८५ धावांनी हरवले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हा आजवरचा सर्वात मोठा विजय ठरला होता.
रणजी करंडक स्पर्धेचा विचार करता सर्वात मोठा विजय हा बंगालच्या नावावर होता. बंगालच्या संघाने डिसेंबर १९५३ मध्ये ओडिशा संघाचा ५४० धावांनी पराभव केला होता. तर भारतात खेळलेल्या गेलेल्या प्रथमश्रेणी क्रिकेट सामन्यातील सर्वात मोठा विजय हा २०११ मध्ये दिलीप ट्रॉफीमध्ये दक्षिण विभागाने मध्य विभागाचा ५५२ धावांनी पराभव केला होता.
मुंबईच्या संघाने आपला पहिला डाव ८ बाद ६४७ धावांवर घोषित केला होता. मुंबईच्या सुवेद पारकर याने पहिल्या डाव्यात व्दिशतक झळकावले. तर सरफराज खान याने १५३ धावांची दमदार खेळी केली. तर पहिल्या डावात उत्तराखंडचा संघ ११४ धावांवर धुव्वा उडवला. मुंबईच्या संघाने दुसर्या डावात ३ बाद २६१ वर घोषित करत उत्तराखंड संघाला ७९५ धावांचे लक्ष्य दिले. मात्र धावांचा पाठलाग करताना उत्तराखंडचा संपूर्ण संघ केवळ ६९ धावांवरच गारद झाला. या कामगिरीमुळे मुंबई संघाने एक नवा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.
हेही वाचा :