पुढारी ऑनलाईन
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका मालिका 'रंग माझा वेगळा' मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल. रंग माझा वेगळा या मालिकेतील कलाकार दीपा-कार्तिकने काही कालावधीतचं प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. या मालिकेत दीपा-कार्तिक कित्येक वर्षानंतर समोर आले आहेत. 'रंग माझा वेगळा' मध्ये ते दोघे पुन्हा एकत्र यावेत, अशी अनेक फॅन्सची इच्छा आहे. दरम्यान, कार्तिकी सौंदर्याला घेऊन आपली मैत्रीण दीपिकाच्या घरी पोहोचते.
सौंदर्या आणि कार्तिकी जेव्हा दीपिकाच्या घरी जाते. तेव्हा दीपिका सौंदर्याला आपल्या आईचा म्हणजेच दीपाचा फोटो दाखवते. दीपाचा फोटो पाहून सौंदर्याला आश्चर्याचा धक्का बसतो. कारण, कार्तिकीची मैत्रीण दीपिका आणि कार्तिकी यांची आई एकचं आहे-ती म्हणजे दीपा.
दुसरीकडे कार्तिक आणि दीपाचा घटस्फोट होणार आहे. दरम्यान, आयशाने कार्तिकला आपल्या प्रेमाच्य़ा जाळ्यात ओढलंय. आयशा-कार्तिक साखरपुडा करणार आहेत. आता दीपाच कार्तिकीची आई आहे, हे सत्य सौंदर्यासमोर येणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
या मालिकेत दीपाची भूमिका रेश्मा शिंदे हिने साकारलीय. या मालिकेत दीपाची भूमिका रेश्मा शिंदे हिने साकारलीय. रिअल लाईफमध्ये रेश्मा शिंदे खूप सुंदर आणि ग्लॅमरस आहे. तिचे खरे फोटो पाहून तुम्हाला अजिबात विश्वास बसणार नाही.
वर्षाच्या सुरुवातीला तिने आपल्या पार्टनरसोबतचा फोटो इन्स्टाग्रामर अपलोड केलाय. रेश्मा शिंदेने नवीन वर्षात पहिला फोटो शेअर केला आहे. रेश्माने तिच्या आईसोबतचा फोटो नवीन वर्षात शेअर केला आहे. यासोबत तिने कॅप्शन लिहिलीय की-नवीन वर्षाच्या शुभेच्छा..! नवीन वर्षाची सुरूवात माझ्या आवडत्या पार्टनरसोबत. आई. २०२२मधील पहिला फोटो. रेश्माच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळतेय. शिवाय तिचे कौतुक आणि शुभेच्छा देतानाही चाहते दिसत आहेत.
हेही वाचलं का?