Animal Collection 
Latest

Animal Collection : नवव्या दिवशी ‘अॅनिमल’ नं रचला इतिहास; ६६० कोटींच्या क्लबमध्ये

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, साऊथ स्टार रश्मिका मंदाना, बॉबी देओल, तृप्ती डिमरी आणि अनिल कपूर यांचा 'अॅनिमल' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ( Animal Collection ) घालत आहे. या चित्रपट रिलीज होवून फक्त ९ दिवस झाले असून वर्ल्डवाईड ६६० कोंटीच्या घरात पोहोचला आहे. यापुढेही या चित्रपटाच्या कमाईचे आकडे वाढत राहिले तर लवकरच चित्रपट १०० कोंटीच्या घरात पोहचेल असे निर्मात्यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या 

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' ला येत्या विकेंट म्हणजे शनिवार- रविवारचा फायदा होवून कमाईचे आकडे वाढणार आहेत. या चित्रपटाने ओपनिंगच्या पहिल्या दिवशी म्हणजे, शुक्रवारी ६३.८० कोटींची, दुसऱ्या दिवशी म्हणजे, शनिवारी ६६. २७ कोटींची आणि विकेंटच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे, रविवारी या चित्रपटाने जबरदस्त बॉक्स ऑफिसवर ७१. ४६ कोटींची कमाई केली होती. तर चौथ्या दिवशी ४० कोटींची कमाई केली होती. गेल्या रविवारी सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूडमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा चित्रपट ठरला होता. यानंतर चित्रपटाची घोडदौड सुरूच राहिली.

यानंतर 'अॅनिमल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण ३९५.२७ कोटी रुपयांचा कमाई केली. तर जगभरात या चित्रपटाने भरघोष अशी कमाई करत ६६०.८९ कोटींची कमाई ( Animal Collection ) केली आहे. जगभरात हिंदी भाषेतील चित्रपटाने ४९.१२ कोटी, तेलुगूमध्ये ४०.३६ आणि तमिळमध्ये ३३. २५ कोंटीचा टप्पा पार केला आहे. यावरून जगभरात हा चित्रपट ६६०.८९ कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या 'टायगर जिंदा है', शाहरूख खानच्या 'जवान' आणि सनी देओलच्या 'गदर २' या चित्रपटाच्या पहिल्या आठवड्यातील कलेक्शनला मागे टाकण्यात यशस्वी झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT