Katrina-Vicky Kaushal : कॅटरिनाचा ‘तो’ न पाहिलेला व्हिडिओ अन् विकीसोबत रोमॅँटिक मूड | पुढारी

Katrina-Vicky Kaushal : कॅटरिनाचा 'तो' न पाहिलेला व्हिडिओ अन् विकीसोबत रोमॅँटिक मूड

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपल म्हणून अभिनेता विकी कौशल्य आणि अभिनेत्री कॅटरीना कैफला ओळखले जाते. नुकताच या कपलने त्याच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यानंतर विकी आणि कॅटच्या फॅन्सनी त्यांना भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यानच विकीने कॅटसोबतचा एक न पाहिलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ( Katrina -Vicky Kaushal )

संबंधित बातम्या 

अभिनेता विकी कौशल्यने लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कॅटरिनासोबतचा एक अनसीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत विकी आणि कॅटरिना एका विमानातून प्रवास करताना दिसत आहेत. विकी त्याच्या कानात हेडफोन लावून शांत बसला आहे. तर कॅटरिना त्याच्या बाजूला बसून चित्रपटाचा आनंद घेत आहे. याच दरम्यान ती वेगवगळ्या स्टाईलमध्ये बसून हातवारे करतानाही दिसत आहे. यावेळी कॅटरिना खूपच आनंदीत असून हा व्हिडिओ अंधारात शूट केल्याचे निदर्शनास येत आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना विकीने लिहिले की, ‘उड्डाण आणि आयुष्यात मनोरंजन! लव्ह यू सुंदर… keep it coming. 😘❤️😘’. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह बॉलिवूड कलाकारांनी भरभरून कौतुक करताना कॉमेन्टस केल्या आहेत. ( Katrina -Vicky Kaushal )

दुसरीकडे अभिनेत्री कॅटरिनानेही विकीसोबतचा एक रोमॅँटिक फोटो शेअर केला आहे. यात विकी व्हाईट कलरची टोपी आणि व्हाईट कलरच्या टिशर्टमध्ये दिसतोय. तर कॅटरिना फुलांफुलांच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेय. यावेळी खास करून कॅटनं विकीजवळचा फोटो शेअर केलाय. या फोटोला तिने ‘…….. my 🤍🤍🤍’. अशी कॅप्शन लिहिली आहे. यावरून हे क्यूट कपल रोमॅँटिक मूडमध्ये असल्याचे पाहायला मिळतेय. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने दोघांचे कौतुक करताना एक हास्याचा ईमोजी शेअर केलाय. या फोटोला १६ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

विकी कौशल आणि कॅटरिना कैफ ९ डिसेंबर २०२१ रोजी माधोपूरच्या फोर्ट बरवडा येथे लग्न बंधानात अडकले. आता दोघांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, कॅटरिना आणि विकी कौशल सध्या त्याच्या-त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहेत. विकी ‘सॅम बहादूर’ या चित्रपटातून सर्वांची मने जिंकली आहेत. तर कॅटरिनाचा ‘टायगर ३’ हा चित्रपट आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

Back to top button