पुढारी ऑनलाइन डेस्क : Ramdev BaBa : योग गुरू रामदेव बाबा यांचे आक्षेपार्ह कार्टून पोस्टर बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी डेहराडून येथील दोन कार्टूनिस्टवर उत्तराखंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Ramdev BaBa : याविषयी कनखल पोलिस ठाण्याचे प्रभारी मुकेश चौहान यांनी सांगितले की, पतंजली योगपीठच्या कायदेशीर बाबी हाताळणा-या अधिका-याने याविरोधात तक्रार दाखल केली होती. दोन्ही आरोपींवर आक्षेपार्ह कार्टून पोस्टर बनवून योगगुरू रामदेव बाबा यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
Ramdev BaBa : कार्टूनिस्ट गजेंद्र रावत आणि हेमंत मालवीय अशी या दोन्ही कार्टूनिस्टची नावे आहेत. दिलेल्या तक्रारीनुसार कनखल पोलिस ठाण्यात दोघांवर धार्मिक भावना भडकवण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 153 ए च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोघांच्या अटकेसाठी ठाणा अधिका-यांनी त्यांचा शोध घेणे सुरू केले आहे.
हे ही वाचा :