Latest

Ram Mandir : नेपाळमधील जानकी मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनाही रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी निमंत्रण

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क :  रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या जोरदार तयारी सुरु आहे. या सोहळ्याला अनेकांना निमंत्रित करण्यात आले आहे. रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याला नेपाळच्या जानकी मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. मुख्य पुजारी यांच्यासह  उपनियुक्त यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. (Ram Mandir)

२२ जानेवारीला अयोध्येत फक्त निमंत्रितांना प्रवेश

 रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी 22 जानेवारीला गर्दीमुळे अप्रिय घटना घडू नये म्हणून ज्यांना रामलल्लाचे निमंत्रण आहे, असेच लोक अयोध्येत या दिवशी दाखल होऊ शकतील, असा दंडक करण्यात आला आहे. सरकारी कर्तव्यावर तैनात लोक मात्र या दंडकाला अपवाद असतील. 23 ला मात्र दर्शन सर्वांसाठी खुले राहील. निमंत्रितांसाठी निवासाची सुविधा अपुरी येऊ नये म्हणून 22 तारखेला लागून अयोध्येतील सर्वच हॉटेल्स, लॉजिंग-बोर्डिंगमध्ये झालेले खोल्यांचे बुकिंग (आरक्षण) रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जारी केले आहेत.

Ram Mandir : 21 जानेवारीपासून मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा

 अयोध्येतील राम मंदिरामध्ये 21 जानेवारीपासून मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा सुरू होणार आहे. हा धार्मिक विधी 23 जानेवारीपर्यंत सलग तीन दिवस राहणार आहे. मंदिराच्या ट्रस्टच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राम जन्मभूमीतील या सोहळ्यासाठी अधिकृत निमंत्रण देण्यात येणार आहे. साधू-संतासह महनीय व्यक्तींना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली होती. ते म्हणाले होते की, मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा मुख्य सोहळा बिगरराजकीय असणार आहे. सोहळ्याच्या ठिकाणी व्यासपीठ असणार नाही. कोणत्याही प्रकारची जनसभा घेण्यात येणार नाही. विविध राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात येणार आहे. ज्या राजकीय पक्षांना या सोहळ्यास यायची इच्छा असेल, ते येऊ शकतात. कोव्हिड-19 मुळे 5 ऑगस्ट 2020 रोजी रामजन्मभूमीवर भूमिपूजन सोहळा मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 136 सनातन परंपरेतील 25 हजार हिंदू साधू-संतांशिवाय 10 हजार खास पाहुण्यांना निमंत्रित केले जाणार आहे. रामलल्लाच्या गर्भगृहाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे, अशी माहितीही राय यांनी दिली.

भाविकांसाठी महिनाभर मोफत अन्नछत्र

या सोहळ्यानिमित्त देशभरातील भाविक अयोध्येला भेट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात एक महिन्यासाठी भाविकांसाठी मोफत अन्नछत्राची सुविधा करण्यात येणार आहे. दररोज एक लाख भाविकांना भोजन देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT