Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding 
Latest

Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding : एक दुजे के लिए! गोव्यात पार पडले रकुल प्रीत सिंह-जॅकी भगनानीचे लग्न

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचे लव्हबर्ड रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी आज बुधवारी दि. २१ रोजी विवाहबद्ध झाले. आनंद कारजच्या प्रथेप्रमाणे (शीख विवाह सोहळा) दोघांनीही गोव्यात लग्न केले. एकमेकांना दीर्घकाळ डेट केल्यानंतर रकुल आणि जॅकीचा प्री-वेडिंग सोहळाही गोव्यात पार पडला. त्यासाठी दोघेही तीन दिवस आधीच गोव्यात पोहोचले होते.

संबंधित बातम्या –

या लग्नसोहळ्यात फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. या दोघांचे लग्न शीख रितीरिवाजानुसार पार पडले. पण लग्नाचे फोटो अद्याप समोर आलेले नाहीत. त्यांच्या लग्नाच्या पहिल्या झलकची वाट फॅन्स पाहत आहेत. एखा वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लग्नाचे विधी पूर्ण झाले आहेत. या लग्नाला चित्रपट जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.

यावेळी शिल्पा शेट्टी, अर्जुन कपूर, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर-अनन्या पांडे आणि ईशा देओल यांच्यासह अनेक स्टार्सनी त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती.

हिंदू रितीरिवाजानुसार लग्न करणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, हे जोडपे हिंदू रितीरिवाजानुसार लग्नही करणार असल्याचं म्हटलं जात आहे. दोघेही संध्याकाळी हिंदू रितीरिवाजानुसार लग्न करणार आहेत. या जोडप्याचे लग्नाआधीचे कार्यक्रम १९ फेब्रुवारीपासून सुरू झाले.

गोव्याला लग्नासाठी जाण्यापूर्वी रकुल आणि जॅकीने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते.

video-viral bhayani insta वरून साभार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT