jailer movie 
Latest

Rajinikanth Jailer : जगभरात जेलरचा जलवा, ५०० कोटींचा आकडा लवकरच गाठणार?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुपरस्टार थलैवा रजनीकांत सध्या जेलर चित्रपटामुळे चर्चेत आहेत. (Rajinikanth Jailer ) जेलरने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ४८७.३९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. जेलर ९ व्या दिवशी ५०० कोटींचा आकडा पार करण्यास तयार आहे. चित्रपटाचे एकूण भारतातील नेट कलेक्शन २४४.८५ कोटी रुपये आहे. (Rajinikanth Jailer )

'जेलर' आपल्या पहिल्या आठवड्यात २३५.८५ कोटी रुपये कमवण्यात यशस्‍वी ठरला आहे. ज्यामध्ये तमिळ १८४.६५ कोटी रुपये, तेलुगु ४७.०५ कोटी रुपये, कन्नड २.०५ कोटी रुपये आणि हिंदी भाषेतील चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २.१ कोटी रुपयांची कमाई केली.
दरम्यान, फुटबॉल जगतातील दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टीयानो रोनाल्डोनेदेऱील थलैवाच्या फॅन्सच्या यादीत समाविष्ट झाला आहे. रोनाल्डोने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यानंतर म्हटले जात आहे की, त्याने दुबईमध्ये आपल्या परिवारासोबत जेलर पाहिला. याबाबत The CR7 Timeline या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देण्यात आली आहे.

रिपोर्टनुसार, ज्यादिवशी रजनीकांतचा चित्रपट रिलीज झाला होता, त्यावेळी रोनाल्डो सिनेमागृहामध्ये गेला होता. रोनाल्डोने दुबईतील एका सिनेमागृहाजवळ आपल्या कुटुंबासोबत फोटो क्लिक करून तो सोशल मीडियावर शेयर केला आहे. रजनीकांत यांचा 'जेलर' सिनेमा भारतासह जगभरात चांगली कमाई करत आहे. रोनाल्डोचे फोटो व्हायरल होण्यापूर्वी राजकीय नेते एमके स्टॅलिन आणि पिनाराई विजयन यांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जेलर रिलीजच्या अवघ्या सात दिवसांत या चित्रपटाने ४५० कोटींची कमाई केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT