मुंबई; पुढारी ऑनलाईन : ठाण्यातील उत्तर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणावर प्रहार करणार याची रंगली होती. राज ठाकरे लाव रे तो व्हिडिओ पार्ट २ करणार का याचीही उत्सुकता होती. गुडीपाडव्याच्या सभेत मशिदीवरून भोंगे उतरले नाही, तर दुपटीच्या आवाजाने भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला होता.
त्यांच्या या विधानानंतर राज ठाकरेंवर सडकून टीका झाली होती. त्या टीकेवरून आता राज ठाकरे यांनी आपल्याच जुन्या भाषणातील तीन व्हिडिओ सादर करत भोग्यांना यापूर्वीही विरोध केल्याचे दाखवून दिले. त्यांनी अजित पवारांवर टीका करताना मी कधी काय बोललो हे मला चांगलं लक्षात असतं असा टोला लगावला.
राज ठाकरे म्हणाले की, राज्य सरकार आणि गृह खात्याला सांगणं आहे आम्हाला महाराष्ट्राचे स्वास्थ बिघडावयचे नाही, पण त्याआधी 3 मे पर्यंत सगळ्या मौलवींना बोलावून भोंगे उतरवण्यासाठी सांगा. मतांसाठी वाटेल ते चालवून घेणार नाही. मतांसाठी वाटेल ते चालवून घेणार नाही. तसे झाली नाही, तर देशभर हनुमान चालीसा लावा. आम्ही वातावरण बिघडवत नसून हा धार्मिक नव्हे तर सामाजिक विषय आहे.