Rahul Gandhi Vs Modi 
Latest

Rahul Gandhi Vs Modi : आता ललित मोदीही राहुल गांधींवर दाखल करणार मानहानीचा खटला

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी ते ब्रिटनच्या न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरूद्ध दावा दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राहुल गांधी यांनी मोदी अडनावावर (Rahul Gandhi Vs Modi) केलेल्या टिकेविरोधी ते न्यायालयात जाणार असल्याचे गुरूवारी (दि.३०) ट्विट करत सांगितले आहे. आयपीएलमधील आर्थिक अपहरणांच्या आरोपांनी घेरल्यानंतर 2010 पासून ललित मोदी लंडनमध्ये वास्तव्यास आहेत,-. तेथूनच त्यांनी भारतातील या घटनेत हस्तक्षेप केला आहे.

राहुल गांधी यांनी एका सभेत "सर्व चोरांना मोदी हे समान आडनाव कसे काय?" असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच यावेळी राहुल गांधी यांनी आयपीएलमधील आर्थिक अपहरणातील आरोपी ललित मोदी आणि फरारी हिरे व्यापारी नीरव मोदी यांचा देखील संदर्भ दिला होता. यानंतर राहुल यांनी 'मोदी आडनाव' (Rahul Gandhi Vs Modi)  बद्दल केलेल्या या टिप्पणीबद्दल त्यांच्यावर सुरतमध्ये मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. यानंतर सुरतच्या न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. याचा परिणाम म्हणजे त्यांचे संसदीय सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यांची खासदारकीही रद्द झाली.

ललित मोदी ((Rahul Gandhi Vs Modi) यांनी राहुल गांधीसंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, तो स्वत:ला पूर्ण मुर्ख बनताना पाहण्यास अधिक उत्सुक आहे. तुम्ही काही पत्ते आणि फोटो दाखवून भारतातील जनतेला मुर्ख बनवू शकत नाही. गांधी परिवार देशावर राज्य करणारा हक्कदार असल्यासारखे वागत आहे. तुम्ही कडक उत्तरदायी कायदे करताच मी भारतात परत येईन, असे मोदी यांनी म्हटले आहे.

Rahul Gandhi Vs Modi : ट्विटरवरून 'मोदी' अडनावाचे कौतुक

मोदी अडनावावर बोलताना ललित मोदी यांनी म्हटले आहे की, मी काही पैसा घेतला आहे हे गेल्या पंधरा वर्षात सिद्ध झालेले नाही. परंतु, या जगातील सर्वात मोठा #स्पोर्टिंग इव्हेंट मी घडवून आणला. ज्यामुळे भारताने १०० डॉलर्सची कमाई केली हे मात्र सिद्ध झाले असल्याचेही ते म्हणाले. १९५० च्या सुरूवातीपासून #मोदी-परिवाराने देशासाठी खूप काही केले आहे, याची ते कधीही कल्पना करू शकणार नाहित. काँग्रेसने हे विसरू नये की, त्यांच्या एखाद्या नेत्याने काम केले नसेल इतके मी देशासाठी केले आहे. मी स्वप्न पाहू शकतो, त्याच्या कितीतरी पट मोठी कृती करू शकतो. तेव्हा आपल्या गांधी घराण्याप्रमाणे तुम्ही घोटाळे करणाऱ्यांवर टीका करत राहा, जय हिंद! असे म्हटले आहे.

राहुल गांधी मागणार उच्च न्यायालयात दाद

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अद्याप ललित मोदींच्या ट्विटवर किंवा त्यांच्या कायदेशीर धमकीवर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांना देण्यात आलेली शिक्षा ही राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा त्यांच्या पक्षाचा दावा असून राहुल त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. राहुल गांधी यांनी क्रोनी कॅपिटलिझमसह विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर टीका केली आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT