Latest

Rahul Gandhi Interview : लग्न केव्‍हा करणार? प्रश्‍नावर राहुल गांधी म्‍हणाले, “लग्नाबद्दल माझ्या मनात…”

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi Interview) यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ही यात्रा सध्या जम्मू-काश्मीरमध्ये आहे. या दरम्यान, राहुल गांधी यांनी एका विशेष मुलाखतीत आपले व्हिजन स्पष्ट केले आहे. त्यांनी अनेक छोटे-मोठे पैलू उलगडले आहेत. तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभव आणि सवयीही शेअर केल्या आहेत. काँग्रेसने ही मुलाखत सोशल मीडियावर शेअर केली आहे. विविध प्रश्‍नांना  राहुल गांधी यांनी दिलेली उत्तरे जाणून घेऊया…

Rahul Gandhi Interview प्रश्न: तुम्हाला काय खायला आवडते ?

मी (Rahul Gandhi Interview)  सर्व काही खातो. मात्र, मला फणस आणि वाटाणे आवडत नाहीत. जेव्हा मी घरी असतो. तेव्हा मी खाण्यापिण्याविषयी कडक पथ्य पाळतो; परंतु प्रवासात असताना काहीही खाण्याला मुभा देतो. उत्तर प्रदेशात स्थलांतरित झालेल्या काश्मिरी पंडिताच्या घरात माझा जन्म झाला. माझे आजोबा पारशी होते. त्यामुळे घरचे अन्नही सामान्य असते.

 प्रश्न: लग्न केव्‍हा करणार ?

योग्य मुलगी सापडली की लग्न करू, परंतु अट एकच आहे की, मुलगी हुशार असावी. माझ्या आई-वडिलांचे लग्न अप्रतिम झाले होते. त्यामुळे लग्नाबद्दल माझ्या मनात खूप उच्च विचार आहेत. मला पसंत पडेल, अशी योग्‍य मुलगी मिळाली की मी लग्‍न करणार आहे,   असे राहुल गांधी यांनी स्‍पष्‍ट केले.

प्रश्न: खाण्यापिण्यासाठी दिल्लीतील तुमची आवडती ठिकाणे कोणती ?

 पूर्वी ते जुन्या दिल्लीला जायचे. आता मोती महालाकडे जात आहे. मी कधी सागर, स्वागत तर कधी सरवण भवनात जातो. भारत जोडो यात्रेत मी देशातील संस्कृती जवळून पाहिली आहे. तेलंगणासारख्या काही राज्यांमध्ये मसालेदार अन्नाचा वापर खूप जास्त आहे. संस्कृती केवळ राज्यांमध्येच नाही. तर राज्यांमध्येही बदलते. जेवणात चिकन टिक्का, सीख कबाब आणि चांगले ऑम्लेट मला खूप आवडते.

Rahul Gandhi Interview :  रागावल्यावर काय करता ?

 जेव्हा मला खूप राग येतो, तेव्हा मी पूर्णपणे गप्प राहतो. भारत जोडो यात्रा ही एक तपश्चर्या आहे. भारतीय संस्कृतीत तपश्चर्याचे खूप महत्त्व आहे. म्हणूनच कोणतेही काम करताना येणाऱ्या अडचणी ही एक प्रकारची तपश्चर्या आहे.

प्रश्न: तुमची पहिली नोकरी आणि पगार याबद्दल सांगा.

मी पहिले काम लंडनमध्ये केले होते. त्यावेळी मला मिळणारा पगार त्या वेळेनुसार बऱ्यापैकी होता. कंपनीचे नाव 'मॉनिटर' होते. धोरणात्मक सल्लागार कंपनी होती. पहिल्यांदा मला चेकने पगार मिळाला. मी त्यावेळी भाड्याच्या घरात राहत असल्याने सर्व काही त्यातच पैसे खर्च होत होते. सुमारे अडीच हजार पौंड पगार मिळायचा. तो पगार त्यावेळच्या मानाने खूप जास्त होता.

Rahul Gandhi Interview : पंतप्रधान झालात तर तुम्हाला काय करायला आवडेल ?

 मला देशाची शिक्षण व्यवस्था सुधारायची आहे. मी लहान व्यवसायात गुंतलेल्या लोकांना मदत करू इच्छितो. शेतकरी, मजूर आणि बेरोजगार युवक सध्या अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहेत. त्यांना मी सुरक्षा देऊ इच्छितो, असेही राहुल गांधी म्‍हणाले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT