Latest

Race attack on Indian : ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यावर वांशिक हल्ला, 11 वेळा चाकूने वार

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Race attack on Indian : ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यावर वंशभेदावरून हल्ला करण्यात आला. त्याच्यावर चाकूने 11 वेळा वार करण्यात आले. ही घटना सहा ऑक्टोबर रोजी घडली असून हा विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर कुटुंबिय ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी व्हिसा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.

Race attack on Indian : टाइम्स ऑफ इंडियाने या संबंधिचे वृत्त दिले आहे. शुभम गर्ग (वय 28 वर्षे) हा आग्रा येथील रहिवासी असून तो ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी करत आहे. त्याच्या पालकांनी सांगितले की, ते गेल्या सात दिवसांपासून ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु ते सुरक्षित करू शकले नाहीत. शुभमने आयआयटी मद्रासमधून बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी आणि मास्टर ऑफ सायन्स पदवी पूर्ण केली आणि 1 सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाला गेला.

Race attack on Indian : कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभमच्या चेहऱ्यावर, छातीवर आणि पोटावर अनेक जखमा झाल्या आहेत. याप्रकरणी एका 27 वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली असून त्याच्यावर "हत्येचा प्रयत्न केल्याच्या एका गुन्ह्याचा" आरोप ठेवण्यात आला आहे.

पीडिताचे वडील रामनिवास गर्ग यांनी सांगितले की, शुभमच्या ऑस्ट्रेलियातील मित्रांनी पुष्टी केली की ते किंवा शुभम दोघेही हल्लेखोराला ओळखत नव्हते. "हा वांशिक हल्ला असल्याचे दिसते. आम्ही भारत सरकारला आम्हाला मदत करण्याची विनंती करतो."

Race attack on Indian : आग्राचे जिल्हा दंडाधिकारी नवनीत चहल यांनी सांगितले, "पीडित मुलाच्या भावाच्या व्हिसा अर्जावर प्रक्रिया सुरू आहे. आम्ही MEA सोबत समन्वय साधत आहोत. मी सिडनीतील दूतावासाच्या अधिकाऱ्यांशीही बोललो आहे. लवकरच व्हिसा उपलब्ध करून दिला जाईल."

दरम्यान, अमेरिका – युरोपनंतर आता ऑस्ट्रेलियातही भारतीयांवर वांशिक हल्ले होत आहे. ही एक प्रकारे गंभीर आणि चिंतेची बाब आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT