पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी १६८ धावांचे लक्ष्य दिले आहे. त्यांनी २० षटकात ७ गडी गमावून १६७ धावा केल्या. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक १०३ धावा केल्या. त्यांच्याशिवाय सॅम करण आणि सिकंदर रझा यांनाच दुहेरी आकडा पार करता आला. (DC vs PBKS)
सॅम करणने २४ चेंडूत २० आणि सिकंदर रझाने ७ बॉलमध्ये नाबाद ११ धावा केल्या. शिखर धवन ७, जितेश शर्मा ४, लियाम लिव्हिंगस्टोन ४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. हरप्रीत ब्रार आणि शाहरुख खानने प्रत्येकी २ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून इशांत शर्माने सर्वाधिक २ बळी घेतले. अक्षर पटेल, प्रवीण दुबे, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी १ विकेट घेतली.
हेही वाचा;