Urfi Javed Marriage 
Latest

Urfi Javed Marriage : मला तुझ्यासारखी पत्नी हवीय; उर्फीला पुनीत सुपरस्टारची मागणी

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस फेम अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या वैवाहिक जीवनात अतरंगी फॅशन सेन्सनं नेहमीच चर्चेत असते. वेस्टर्न लूक असो वा साडीतील लूक ती नेहमीच चर्चेचा विषय बनते. कधी- कधी तर तिला तिच्या स्टाईलमुळे सोशल मीडियावर ट्रोलिगचा सामना करावा लागतो. तर काही वेळा तिला जीवे मारण्याची धमकीही दिली जाते. पण उर्फी कोणालाही घाबरत नाही. ती तिच्या नवनविन स्टाईल वापरून सोशल मीडियावर येत राहते. दरम्यान उर्फी आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. उर्फीला 'बिग बॉस ओटीटी सीझन २' फेम पुनीत सुपरस्टारने नुकतेच हात जोडून लग्नाची मागणी घातली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ( Urfi Javed Marriage )

संबंधित बातम्या 

अभिनेत्री उर्फी जावेद ( Urfi Javed Marriage ) लग्नाची मागणा घालतानाचा एक व्हिडिओ पुनीत सुपरस्टारने त्याच्या इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात पुनीत एका कारमध्ये बसलेला दिसत असून तेथून तो बोलत आहे. याशिवाय त्याने उर्फीचा एक फोटो व्हिडिओच्या वरच्या बाजूस लावला आहे.

'गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मनातली एक गोष्ट तुला सांगायची होती. पण कसं सांगावं हे कळत नव्हतं. उर्फी माझं तुझ्यावर खूपच प्रेम आहे. मला तुझ्यासारखी मुलगी (पत्नी) जोडीदार म्हणून हवी आहे. हात जोडून मी तुला विनंती करतो की, कृपया माझ्यासोबत लग्न कर'. असे त्याने म्हटलं आहे.

दरम्यान अभिनेत्री उर्फीने पुनीतला नकार देताना म्हटलं की, 'पुनीतसोबत लग्न करणार नाही. पण लव्ह यू टू. यावरून उर्फी या लग्नाला तयार नसल्याचे दिसतेय. मात्र, पुनीत सुपरस्टारने शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान नेटकऱ्यांनी 'हे फक्त एक स्टंट आहे'. 'उर्फी आणि पुनीत जोडी खूपच छान दिसेल' असे कॉमेन्टस केली आहे. उर्फी जावेद आणि पुनीत सुपरस्टार दोघेही सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून सक्रिय असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT